मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार कचोरी

Photo of Matar kachori by Puja Panja at BetterButter
650
2
0.0(0)
0

मटार कचोरी

Dec-15-2018
Puja Panja
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार कचोरी कृती बद्दल

हिवाळी पाककृती. हे प्रसिद्ध पारंपारिक बंगाल रेसिपी आहे. हिवाळा ताज्या वाटाणे सह विशेषतः बनविले जाते.

रेसपी टैग

  • वेस्ट  बंगाल
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सारण बनवण्यासाठी :-
  2. हिरव्या मटार ३०० ग्राम
  3. अदरक १" टूकड़ा
  4. हिरवी मिरची १
  5. तेल १ चमचे
  6. मोहरी १चमचे
  7. चिमूटभर हिंग
  8. जिरे पूड १ मोठे चमचे
  9. धने पूड १ मोठे चमचे
  10. लाल तिखट १ छोटे चमचे
  11. चवीनुसार मीठ
  12. साखर १ मोठे चमचे
  13. कव्हर बनवण्यासाठी :-
  14. मैदा २५० ग्राम
  15. तेल तळण्यासाठी + ३ मोठे चमचे
  16. साखर १ मोठे चमचे
  17. चवीनुसार मीठ
  18. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. सव॔प्रथम एका वाडग्यात २५० ग्राम मैदा, ३ मोठे चमचे तेल , १ मोठे चमचे साखर, चवीनुसार मीठ, एकत्र करून घ्यावे.
  2. पाण्याच्या साह्याने पीठ मळून घ्यावे.
  3. १५ मिनिटे पीठ झाकून ठेवावे.
  4. आता गरम पाण्यात ३०० ग्राम हिरव्या मटार आणि मीठ २ मिनिट उकळवा. हिरव्या मटारचे सव॔ पाणी काढून टाकावे.
  5. मिक्सरमध्ये ३०० ग्राम उकलेले हिरव्या मटार, १" टूकड़ा अदरक , १ हिरवी मिरची वाटून घ्यावे .
  6. सारण बनवण्यासाठी कड़ाई मध्ये एक चमचे तेल गरम करावे.
  7. त्यात १ चमचे मोहरी व चिमूटभर हिंग ची फोडणी घालावी.
  8. नंतर त्यात वाटाण्याची मिश्रण घ्यावे.
  9. १ मोठे चमचे जीरे पूड, १मोठे चमचे धने पूड, १ छोटे चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ,१ मोठे चमचे साखर एकजीव करावे व मिश्रण चांगले परतून घ्यावे.
  10. मिश्रण प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यावे.
  11. मैद्याच्या पिठात ऊन छोटा गोळा घेऊन हाताच्या बोटांनी पसरवून घ्यावे.
  12. मग त्यात हिरव्या मटारचे सारण भरून घ्यावे.
  13. ऊंडा बनवून सव॔ बाजूंनी पॅक करावे.
  14. सव॔ गोळा अशा प्रमाणे तयार करून घ्यावे.
  15. त्याची पोळी लाटून घ्यावी.
  16. सव॔ कचोरी अशा प्रमाणे तयार करून घ्यावे.
  17. कड़ाई मध्ये तेल तापत ठेवावे.
  18. दोन्ही बाजूंनी खुसखुशीत आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
  19. अतिरिक्त तेल काढण्यासाठी एका पेपर नॅपकीनवर ठेवावे.
  20. गरमागरम सव्ह॔ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर