मुख्यपृष्ठ / पाककृती / पचंरत्न कचोरी

Photo of Panchratn kachori by Anita Bhawari at BetterButter
727
2
0.0(0)
0

पचंरत्न कचोरी

Dec-15-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पचंरत्न कचोरी कृती बद्दल

पाच भाज्या घालून कचोरी केली असून थंडीच्या दिवसात चटपटीत खाऊशी वाटत तर ही कचोरी बनवा खूप छान होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • राजस्थान
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 2 वाटी मैदा
  2. 1 वाटी हिरवा वाटाणा
  3. कोबी बारीक चिरलेला
  4. शिमला मिरची बारीक चिरलेली
  5. फ्लोवर बारीक चिरलेला
  6. बटाटा किसून घेतलेला (कच्चा)
  7. जिरे काळीमिरी बडीशेप पावडर
  8. हिरवी मिरची
  9. आले बारीक किसलेले
  10. मीठ
  11. तुप
  12. हिरवी चटणी
  13. साखर
  14. खजुर चिंच चटणी
  15. दही
  16. बारीक शेव
  17. कोथिंबीर
  18. डाळींब दाने
  19. बेकिंग पावडर
  20. पाणी
  21. गरम मसाला लाल तिखट हळद आमचूर पावडर
  22. 1चमचाभर डाळीचे पीठ

सूचना

  1. मैदा मधे मीठ बेकिंग पावडर 1 चमचा तूप घालून पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे 30 मि ठेवून दया
  2. कढई मध्ये बडीशेप जिर काळीमिरि हे सर्व भाजुन घ्या व बारीक पावडर करून घ्या
  3. कढईत तेल घालून सफेद तीळ हिरवी मिरची किसलेले आले घाला
  4. वाटाणा मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे
  5. वाटाणा कोबी शिमला मिरची फ्लॉवर बटाटा टाकून चांगले परतून घ्यावे
  6. गरम मसाला हळद लाल तिखट वाटलेली पावडर आमचूर पावडर मीठ साखर 1चमचाभर चणाडाळ पीठ घालून चांगले एकजीव करून 5/6 मि वाफेवर शिजवून घ्या
  7. भाजी थंड झाल्यावर गोल गोळे तयार करून घ्या
  8. हिरवी चटणी =कोथबिर आल लसुण पाकळ्या मीठ साखर हिरवी मिरची शेंगदाणे कुट लिबूरस पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटुन घ्यावे
  9. गोड चटणी = खजुर चिंच गूळ काळमिठ सुंठ पावडर पाणी घालून 1 उकळी काढुन मिक्सरमधून बारीक वाटुन घ्यावे
  10. तेल गरम करायला ठेवा
  11. पीठाचे गोळे करून घ्या
  12. लाटि करून त्यात भाजीचा गोळा भरुन लाटी बंद करून घ्या
  13. 2 तळहातावर दाबून कचोरी करून घेतली
  14. मंद आचेवर तळून घ्या सोनेरी रंगावर तळून घ्या
  15. प्लेट मध्ये काढून घेऊन त्यात चमच्या ने टोचा
  16. 2 चटण्या दही डाळींब दाने बारिक शेव कोथबिर घालून सजावट करा
  17. थंड किंवा गरम खावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर