Photo of Beet puri by Puja Panja at BetterButter
441
2
0.0(0)
0

बीट पुरी

Dec-16-2018
Puja Panja
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट पुरी कृती बद्दल

शाकाहारी आरोग्यदायी पाककृती, हे पुरी विशेषतः हिवाळी हंगामात तयार केले जाते. बीट मध्ये आयर्न असते, हा पुरी खूप पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बीट १
  2. मैदा २५० ग्राम
  3. मीठ चवीनुसार
  4. रोस्टेड मिरच्या जीरे पूड २ टेबल स्पून
  5. तेल एक टेबल स्पून + ४ कप
  6. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. सव॔प्रथम बीट सोलून बारीक चिरून घ्या.
  2. मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून त्याची प्युरी बनवून घ्या.
  3. मग एका वाडग्यात मैदा, चवीनुसार मीठ, रोस्टेड मिरच्या जीरे पूड, बीटची प्युरी, तेल घाला आणि मिसळा.
  4. आता पाण्याने घट्ट मऊ कणिक मळा.
  5. कणिक ओल्या कापडाने झाकून १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
  6. १५ मिनिट नंतर ते कणिक घ्या आणि १ मिनिट नीट मिसळा.
  7. आता पीठाचा समान भागामध्ये वाटून घ्या. छोटे छोटे गोळे करा .
  8. नंतर एक गोळा घ्या आणि त्याला लाटून घ्या.
  9. कड़ाईत तेल गरम करून.
  10. गरम तेला मध्ये पुरी ठेवा. मध्यम आचेवर छान तळून घ्या.
  11. खाण्यासाठी तयार आहे आपली बीट पुरी.
  12. गरमागरम सव्ह॔ करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर