मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही खीर

Photo of Shahi Khir by Tejashree Ganesh at BetterButter
19
4
0.0(0)
0

शाही खीर

Dec-16-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही खीर कृती बद्दल

हिवाळ्यामधे भरपुर सुकामेवा टाकून ही खीर बनवली जाते, त्याचप्रमाणे थंडी मधे गरम व गरमीमधे थंड खीर फार चविष्ट लागते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • राजस्थान
 • बॉइलिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. शेवया १ कप
 2. तुप २ चमचे
 3. लवंग ३
 4. बदाम ५-६
 5. काजू ५-६
 6. अक्रोट ३-४
 7. मनुके ७-८
 8. पिस्ते ६-७
 9. चारोळी १ चमचा
 10. दुध २-३ कप.
 11. खजूर ३-४ काप करून
 12. साखर १/२ कप किंवा आवडी प्रमाणे
 13. ईलायची पावडर
 14. बडिशेप पावडर
 15. जायफळ पावडर
 16. गुलाब essence
 17. गुलाब पाकळ्या सजावटी करिता

सूचना

 1. सर्व साहित्य एका प्लेट व वाटीमधे काढून घ्यावे,सुका मेवा क्रश करून घ्यावे.
 2. गॅसवर कढई किंवा फ्रयपॅन ठेवावा व त्यात तुप टाकावे.
 3. त्यानंतर लवंग व सर्व सुकामेवा टाकावा. (खजूर टाकू नये)
 4. सर्व साहित्य व्यवस्थित तळून घ्यावे.
 5. ह्यामधे शेवया टाकाव्यात.
 6. शेवया चांगल्या परतून घ्याव्यात. व त्यात दुध टाकावे.
 7. मिश्रण चांगले एकत्र करून घेऊन त्यात खजूर टाकावी.
 8. गुलाब पाकळ्या टाकाव्यात.
 9. थोडावेळ सर्व मिश्रण शिजू द्यावे. ( साधारण ३-४ मि. )
 10. नंतर ह्यात साखर व ईलायची पावडर, जायफळ पावडर, बडिशेप पावडर टाकावी. हे सर्व पावडर साधारण १/२ चमचा होतात.
 11. १ मि. सर्व मिश्रण ढवळून घ्यावे. ह्यामधे rose essence टाकावे. हे optional आहे.
 12. आपली शाही खीर तयार आहे. ही खीर एका bowl मधे काढून त्यावर rose petals आणि बदाम काप ने सजवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर