मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ मटार वडे

Photo of Stuff matter vada by seema Nadkarni at BetterButter
555
3
0.0(0)
0

स्टफ मटार वडे

Dec-16-2018
seema Nadkarni
300 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ मटार वडे कृती बद्दल

थंडी मध्ये मटार भरपुर प्रमाणात मिळतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • स्टर फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 8

  1. 1 कप उडीद डाळ
  2. 1 कप मटार
  3. 1-2 चमचा आले लसुण पेस्ट
  4. 2 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  5. 1 लिंबू चा रस
  6. चवी पुरते मीठ
  7. 1/2 टी स्पून हळद
  8. 1 चमचा चाट मसाला
  9. 1/2 चमचा गरम मसाला

सूचना

  1. उडदाच्या डाळीत पाणी घालून 4-5 तास भिजत ठेवावे.
  2. मटार ला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
  3. वाटताना त्यात हिरव्या मिरच्या व थोडी कोथिंबीर घालून वाटावे.
  4. एका कढईत तेल तापवून त्यात लसूण घालून फोडणी करावी,
  5. त्यात मटार चे मिश्रण घालून एकत्र करावे.
  6. त्यात चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला, हळद, लिंबाचा रस घालून एकत्र करावे.
  7. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे गोळे करुन घ्या.
  8. उडदाच्या डाळीला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
  9. या मिश्रणात थोडे मीठ घालून एकत्र करावे. सतत हलवत राहावे म्हणजे ते पीठ हलके होतील.
  10. तेल तापवून घ्यावे. मटार चा गोळा या मिश्रणात बुडवून त्याचे वडे तळून घ्यावे. ( बटाटे वडे सारखे)

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर