मुख्यपृष्ठ / पाककृती / बिस्किट केक

Photo of Biscuit cake by Rohini Rathi at BetterButter
958
5
0.0(0)
0

बिस्किट केक

Dec-27-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिस्किट केक कृती बद्दल

उरलेल्या बिस्किटांच्या तुकड्यापासून बनवलेला हा केक खाण्यात खूप स्वादिष्ट लागतो व बनवण्यास खूप कमी वेळ लागतो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बिस्किटाचे तुकडे अर्धा डबा
  2. साखर अर्धा कप
  3. कोको पावडर 1 टेबल स्पून
  4. बेकिंग पावडर 1 ती स्पून
  5. बेकिंग सोडा पाव टीस्पून
  6. दूध एक कप
  7. व्हॅनिला इसेन्स चार ते पाच टेंबे
  8. तेल दोन चमचे

सूचना

  1. सर्वप्रथम बिस्किटाचे तुकडे हाताने बारीक करून घ्यावे
  2. मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यावी
  3. चाळणीने दोन वेळा गाळून घ्यावी
  4. चाललेल्या बिस्किटाच्या पावडरमध्ये पिठीसाखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा चाळून घ्यावा
  5. नंतर दूध व्हॅनिला इसेन्स व तेल घालून बेटर बनवून घ्यावे
  6. केकच्या भांड्याला तेल आणि ग्रीस करून मैदाने डस्ट करून घ्यावे
  7. नंतर त्यावर ती बटर पेपर ठेवावा
  8. तयार केकचे बेटर ग्रीस केलेल्या भांड्यात मध्ये घालून घ्यावे
  9. कुकरला गरम करून घ्यावे
  10. गरम केलेल्या कुकर मध्ये केकचे भांडे ठेवून तीस मिनिटे बेक करून घ्यावे
  11. तीस मिनिटानंतर चमच्याच्या किंवा चाकूच्या साह्याने चेक करून घ्यावे
  12. थंड झाल्यानंतर केक भांड्यातून काढून घ्यावा
  13. नंतर त्यावर ती पिठीसाखर व बडीशोप च्या गोळ्यांनी गार्निश करून घ्यावे
  14. अशाप्रकारे बिस्कीट चा केक तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर