मुख्यपृष्ठ / पाककृती / कडधान्याचे पौष्टीक कटलेट

Photo of Sprouted beans Cutlet by Suchita Wadekar at BetterButter
25
6
0.0(0)
0

कडधान्याचे पौष्टीक कटलेट

Jan-11-2019
Suchita Wadekar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडधान्याचे पौष्टीक कटलेट कृती बद्दल

करायला गेले एक आणि झाले भलतेच असे काहीवेळा आपल्या बाबतीत घडते आणि त्यातून नाविन्यपूर्ण आणि चविष्ट अशी रेसिपी तयार झाली की होणारा आनंद हा द्विगुणित करणारा असतो याची प्रचिती तुम्ही सुद्धा कधी न कधी घेतली असेल. आजची हि रेसिपी हि अशीच त्यायर झाली. मोड आलेल्या कडधान्यांचा पौष्टीक ढोकळा करायला गेले परंतु त्याची चव न आवडल्याने आता ह्याला टेस्टी कसे बनवता येईल या विचारातून हे पौष्टीक कटलेट तयार झाले आणि माझ्या मुलीला प्रचंड आवडले इतके कि माझ्या वाट्याला फक्त एकच आला तोही चव टेस्ट करण्यासाठी. तुम्हीही नक्की करून पहा हे पौष्टीक कटलेट .

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. ● मोड आलेली मिश्र कडधान्ये 1 वाटी
 2. ● दही 2 चमचे
 3. ● आल्याचे तुकडे 1 चमचा
 4. ● लसूण 4 पाकळ्या
 5. ● मिरची 3
 6. ● मीठ आवश्यकतेनुसार
 7. ● सिमला मिरची 1
 8. ● कोबी 1 वाटी
 9. ● कांदा 1
 10. ● पोहे 1 वाटी
 11. ● कॉनफ्लॉवर 4 चमचे
 12. ● शेवई 1 वाटी
 13. ● तळण्यासाठी तेल

सूचना

 1. 1. प्रथम मोड आलेल्या कडधान्यची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी.
 2. 2. या पेस्टमध्ये 2 चमचे दही घालून 4 तास झाकून ठेवावे.
 3. 3. चार तासानंतर त्यात आले, मिरची, लसूण यांची मिक्सरला पेस्ट आणि मीठ घालावे.
 4. 4. नंतर हे बॅटर ढोकळ्याप्रमाणे 20 मिनिटे वाफवून घ्यावे.
 5. 5. तोपर्यंत कांदा, सिमला मिरची बारीक चिरावी, कोबी उभा चिरावा आणि पोहे भिजवावेत.
 6. 6. 20 मिनिटानंतर तयार झालेली ही उकड हाताने मोकळी करावी आणि त्यात भिजवलेले पोहे, चिरलेला कांदा, सिमला मिरची,कोबी घालावा व आवश्यक(उकड मध्ये घातलेले आहे) मीठ घालून एकत्र करून गोळा बनवावा.
 7. 7. तयार झालेल्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून त्याला कटलेटचा आकार द्यावा.
 8. 8. एकीकडे तेल तापत ठेवावे आणि कॉनफ्लॉवरची पेस्ट तयार करावी व शेवई डिश मध्ये काढून घ्यावी.
 9. 9. तेल तापल्यावर गॅस बारीक करावा आणि तयार केलेले कटलेट कॉनफ्लॉवरच्या पेस्ट मध्ये बुडवून शेवई मध्ये घोळवून खरपूस तळून घ्यावेत.
 10. 10. आपले गरमागरम, मोड आलेल्या कडधान्या पासून बनवलेले पौष्टीक कटलेट्स तैयार!
 11. ● सॉस, कोबी आणि सिमलामिरचीचे सॅलेड सोबत सर्व्ह करावे पौष्टीक कटलेट.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर