मुख्यपृष्ठ / पाककृती / अमृतसरी छोले

Photo of Amrutsari Chhole by Tejashree Ganesh at BetterButter
433
2
0.0(0)
0

अमृतसरी छोले

Jan-14-2019
Tejashree Ganesh
615 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अमृतसरी छोले कृती बद्दल

छोल्यांची ही अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • बॉइलिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. मोठे छोले १/२ कप
  2. चहा पावडर १ लहान चमचा
  3. खाण्याचा सोडा १ लहान चमचा
  4. दालचिनी १ ईंच
  5. मिरी ४-५
  6. तमालपत्र ३ लहान तुकडे
  7. पाणी आवश्यकतेनुसार
  8. कांदा १
  9. टोमॅटो २
  10. हळद १ लाहन चमचा
  11. काश्मिरी लाल मिरची पुड २ चमचे किंवा आवश्यकतेनुसार
  12. छोले मसाला २ लहान चमचे
  13. गरम मसाला १ चमचा
  14. कसूरी मेथी २ चमचे
  15. मिठ आवश्यकतेनुसार
  16. तेल २-३ चमचे
  17. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम छोले रात्रभर भिजत घातले.
  2. कुकरमधे छोले, खाण्याचा सोडा व खडा मसाला तसेच चहा पावडरची पुरचुंडी व आवश्यकतेनुसार मिठ टाकून छोले शिजवून घ्यावेत.
  3. दुसरीकडे, कांदा चिरून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
  4. टोमॅटो चिरून त्याचीही पेस्ट तयार करून घ्यावी.
  5. नंतर गॅसवर एक कढईत तेल तापवून घ्यावे व त्यात बारिक केलेला कांदा टाकवा. ही पेस्ट गुलाबी रंग होईपर्यंत परतावी.
  6. आलं-लसून पेस्ट टाकावी.
  7. नंतर टोमॅटोची पेस्ट टाकून बाजूने तेल सुटेपर्यंत परतावे, मसाला तळाला लागू देऊ नये.
  8. आता ह्यामधे मिरची, हळद, गरम मसाला व छोले मसाला टाकून परतावे.
  9. आता ह्यामधे उकडलेले छोले टाकावेत व सावकाश हे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
  10. आवश्यकतेनुसार मिठ घालावे व गरम पाणी घालून हवी तेवढी घट्टासर ग्रेव्ही ठेवावी. (हे छोले घट्ट ग्रेव्हीतच छान लागतात. )
  11. वरून कसूरी मेथी कुस्करून टाकावी.
  12. एक उकळ काढून गॅस बंद करावा.
  13. कोथिंबीर टाकून गरम गरम भटू-यांबरोबर सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर