मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळवांगे

Photo of Dal vange by Swapnal
swapna p at BetterButter
202
2
0.0(0)
0

डाळवांगे

Jan-19-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळवांगे कृती बद्दल

वांग्याची भाजी हरभर्‍याची भिजवलेली डाळ घालून केली आहे आणि त्यातील मसाल्यांमध्ये सुद्धा हरभऱ्याची आणि उडीद डाळ भाजून त्यापासून मसाला बनवून त्यात भरला आहे

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • मेन डिश
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

 1. वांगे
 2. भिजवलेली हरबर्‍याचीडाळ
 3. एक चमचा हरभऱ्याची डाळ व एक चमचा उडीद डाळ
 4. लाल तिखट
 5. कांदा लासून मासाला
 6. हळद
 7. मीठ
 8. धना पावडर
 9. तेल
 10. कोथिंबीर
 11. लसुन
 12. खडा मसाला

सूचना

 1. एक चमचा उडीद डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ तव्यावर भाजून घ्या मग त्यात एक चमचा खडा मसाला घाला गॅस बंद करा
 2. वरील डाळीच्या मिश्रणाची पावडर करा
 3. वांग्याला मधोमध दोन चिरा द्या
 4. एका प्लेटमध्ये भाजलेल्या डाळींची पावडर थोडा शेंगदाण्याचा कूट लाल तिखट कांदा-लसुण मसाला मीठ हळद धने पावडर थोडे पाणी घालून एकत्र करा
 5. मिक्स केलेला मसाला वांग्यांमध्ये भरा
 6. कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसुन भरलेली वांगी घाला व भिजवलेली चणाडाळ घाला छान तेल सुटे पर्यंत परता
 7. नंतर त्यात तुमच्या गरजेप्रमाणे गरम पाणी घाला
 8. झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या
 9. तयार आहे झणझणीत चमचमीत डाळवांगे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर