मुख्यपृष्ठ / पाककृती / चमचमीत दही-मिसळ पाव.. अस्सल नगरी...

Photo of Spicy Dahi Misal Pav..  A'Nagar Special by Tejashree Ganesh at BetterButter
1647
3
0.0(0)
0

चमचमीत दही-मिसळ पाव.. अस्सल नगरी...

Jan-20-2019
Tejashree Ganesh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चमचमीत दही-मिसळ पाव.. अस्सल नगरी... कृती बद्दल

माझ्या गावची.. नगरची ही दही मिसळ.. अगदी मस्त..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेले मठ २ कप
  2. पाणी भाजविण्याकरिता
  3. हळद
  4. हिंग चिमुटभर
  5. मिठ चविपुरते
  6. कांदा
  7. टोमॅटो
  8. लसून पाकळ्या
  9. आलं
  10. हिरव्या मिरच्या
  11. कढिपत्ता
  12. खोबरं
  13. लाल तिखट
  14. गरम मसाला
  15. धने-जिरं पावडर
  16. कोथिंबीर
  17. दही
  18. पाव
  19. लिंबू
  20. फरसाण

सूचना

  1. प्रथम मोड आलेले मठ चांगले स्वच्छ निवडून धूवून हळद, हिंग, मिठ घालून शिजवून घ्यावेत.
  2. कांदा,टोमॅटो, आलं, लसून, कढिपत्ता, खोबरं, मिरच्या एका प्लेटमधे काढून घेतले.
  3. कढईत तेल टाकून कांदा परतावा.
  4. नंतर लसून, आलं व मिरच्या टाकाव्यात.
  5. टोमॅटो टाकावे व मसाला चांगला परतून घ्यावा.
  6. मसाला थंड झाला की मिक्सरमधून बारिक करून घ्यावा.
  7. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी मोहरी तडतडली की हा मसाला टाकून परतून घ्यावा.
  8. बाजूने तेल सुटले की मिरचीपुड, धने-जिरंपुड, गरम मसाला, कढिपत्ता सर्व जिन्नस टाकावे व लगेच हलवून एकत्रित करावे.
  9. लगेच शिजवलेले मठ टाकून एकत्र करावे.
  10. गरजेपुरते पाणी टाकावे, ह्या मिसळचा रस्सा पातळ व तर्रीदार असतो. त्या प्रमाणेत पाणी घालून एकत्र करावे.
  11. कोथिंबीर कापून मिसळमधे टाकावी व झाकण ठेवून उकळ येऊ द्यावी.
  12. गरम गरम मिसळ; दही, पाव व फरसाण सोबत कोथिंबीर व कांदा बारिक करून, लिंबू पिळून serve करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर