मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले चण्याची डबल चोकलेट चीप्स कप केक

Photo of Chole chana chocolate chips cup cake by seema Nadkarni at BetterButter
1255
3
0.0(0)
0

छोले चण्याची डबल चोकलेट चीप्स कप केक

Jan-22-2019
seema Nadkarni
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले चण्याची डबल चोकलेट चीप्स कप केक कृती बद्दल

कडधान्य च्या नवीन प्रयोग म्हणून प्रयत्न केला, खुपच हेल्दी व टेस्टी बनले. संपायला पण आले..

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 कप मल्टी ग्रेन आटा
  2. 1 कप ओट्स
  3. 1/2 कप ब्राऊन शुगर किंवा पीठी साखर
  4. 1 कप दही
  5. 1/2 कप तेल किंवा बटर
  6. 1 कप डाकॅ चोकलेट
  7. 1 कप शिजवलेले छोले चणे
  8. 1/4 कप कोको पावडर
  9. 1 टी स्पून बेकिंग पावडर
  10. 1/2 टी स्पून बेकिंग सोडा
  11. 1/2 कप चोकलेट चिप्स
  12. 1/4 कप दूध (जरूर लागल्यास)

सूचना

  1. सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. ओट्स ला मिक्सर मधून पावडर करून घ्या. त्यात मल्टी ग्रेन आटा एकत्र करून घ्यावे.
  3. त्यात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा, कोको पावडर घालून एकत्र करावे.
  4. बाऊल मध्ये दही व साखर एकत्र करून फेटुन घ्यावे.
  5. त्यात तेल किंवा बटर घालून फेटुन घ्यावे.
  6. छोले चणे शिजवून घ्यावे व मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.
  7. वरील मिश्रणात छोले चण्याची पेस्ट घालून परत एकदा एकरस करून घ्यावे.
  8. पीठाचे मिश्रण त्यात घालून एकत्र करावे.
  9. चोकलेट चे बारीक तुकडे करून डबल बोइलर मेथड नी मेल्ट करून घ्यावे.
  10. मेल्ट केलेली चोकलेट त्यात घालून एकत्र करावे.
  11. कप केक च्या टीन मध्ये तेल लावून ठेवावे. त्यात एक चमचा घालावे.
  12. त्यावर चोको चीप्स डेकोरेशन करावे. व प्रि हीट केलेल्या ओवन मध्ये ठेवून 180'सें वर बेक करून घ्यावे.
  13. या प्रमाणे 15-16 कप केक बनतील.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर