मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळ व कडधान्य लसानिया

Photo of Mix dal lasaniya by Rohini Rathi at BetterButter
946
3
0.0(0)
0

मिक्स डाळ व कडधान्य लसानिया

Jan-24-2019
Rohini Rathi
420 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळ व कडधान्य लसानिया कृती बद्दल

ही एक इटालियन डिश आहे त्याला मी इंडियन टच देण्यासाठी डाळी व कडधान्ये चा वापर करून बनवली आहे हे खाण्यास खूप स्वादिष्ट लागते व लहान मुले कडधान्य आनंदाने याप्रकारे खाऊ घातल्यास खातात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • बेकिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. डाळीचे धिरडे बनवण्यासाठी
  2. मुगाची डाळ पाव कप
  3. तुरीची डाळ पाव कप
  4. चना डाळ पाव कप
  5. मीठ चवीनुसार
  6. काळीमिरी पावडर एक चमचा
  7. हळदी पावडर पाव चमचा
  8. धने पावडर एक चमचा
  9. स्टॉपिंग बनवण्यासाठी
  10. मोड आलेली मिश्र कडधान्य (मटकी मूग हरभरा वाटाणा) एक कप
  11. एक मध्यम आकाराचा कांदा
  12. एक मध्यम आकाराचा टोमॅटो
  13. अर्धा कप चिरलेली शिमला मिरची
  14. आल्याची पेस्ट एक चमचा
  15. लसणाची पेस्ट एक चमचा
  16. तेल एक चमचा
  17. लाल मिरची पावडर एक चमचा
  18. गरम मसाला अर्धा चमचा
  19. हळदी पाव चमचा
  20. मीठ चवीनुसार
  21. ओरेगानो एक चमचा
  22. चिली फ्लेक्स दोन चमचे
  23. चिरलेली कांद्याची पात अर्धा कप
  24. पिझ्झा सॉस चार चमचे
  25. किसलेला चीज एक कप
  26. तेल दोन चमचे

सूचना

  1. सर्वप्रथम सर्व डाळी स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजत घालाव्यात
  2. नंतर स्वच्छ धुऊन पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  3. वाटलेल्या मिश्रणामध्ये काळीमिरी पूड हळद मीठ व धन्याची पूड घालून मिक्स करून घ्यावे
  4. नॉन स्टिक पॅनला तेल लावून एक चमचा बटर घालून पातळ धिरडी बनवून घ्यावे
  5. बाजू उलटून धिरडे दोन्ही बाजूने भाजून घ्यावे
  6. अशाच प्रकारे चार धिरडे बनवून घ्यावे
  7. स्टाफिंग बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून कांदा टोमॅटो लसूण आले-लसणाची पेस्ट परतून घ्यावी
  8. एक कप मोड आलेले कडधान्य स्वच्छ धुवून घ्यावे
  9. परतलेल्या कांद्यामध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर गरम मसाला चिली फ्लेक्स ओरेगानो घालून परतून घ्यावे
  10. नंतर त्यात धुतलेली कडधान्य घालून चवीनुसार मीठ परतून घ्यावे
  11. तयार स्टफिंगचे मिश्रण थंड करून घ्यावे
  12. केकच्या भांड्याला तेल आणि ग्रीस करून घ्यावे
  13. तयार एक धिरडे केकच्या भांड्यात घालावे
  14. त्यावरती पिझ्झा सॉस घालून सर्व बाजूने पसरवून घ्यावा
  15. त्यावरती तयार कडधान्यांचे स्टफिंग मिश्रण पसरवून घ्यावे
  16. वरून किसलेले चीज घालावे
  17. वरून चिली फ्लेक्स घालावे
  18. नंतर दुसरी धिरडे ठेवून पहिल्या दिल्याप्रमाणे पिझ्झा सॉस स्टफिंगचे मटेरियल व चीज घालून घ्यावा
  19. अशाच प्रकारे तिसऱ्या व चौथ्या धिरडे घालून लेअर बनवून घ्यावे चौथ्या धिरड्यावर अति बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घ्यावी
  20. कुकर प्री हीट करून घ्यावा
  21. तयार केकचे भांडे फ्री-हीट केलेल्या कुकरमध्ये ठेवून दहा मिनिटे बेक करून घ्यावे
  22. कुकरची शिट्टी व रिंग काढून घ्यावी झाकण लावून दहा मिनिटे बेक करावे
  23. दहा मिनिटानंतर केकचे भांडे कुकरामध्ये काढून थंड करून घ्यावे
  24. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून डाळ व कडधान्याचे लसानिया गरमागरम सर करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर