मुख्यपृष्ठ / पाककृती / आरोग्यदायी...शक्तीदायी पुलाव

Photo of Healthy power punch Pulav by archana chaudhari at BetterButter
689
3
0.0(0)
0

आरोग्यदायी...शक्तीदायी पुलाव

Feb-04-2019
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आरोग्यदायी...शक्तीदायी पुलाव कृती बद्दल

आरोग्य...ते ही घरातील सगळ्यांचे त्यांच्या आवडीनुसार जपायचे म्हणजे गृहिणीसाठी मोठी बाब आहे...म्हणूनच मी आज एक पदार्थ बनविला आहे...हा एक ग्लूटेन फ्री,लो कार्ब्स, हाय फायबर असणारा पदार्थ आहे...त्यात तुम्ही आवडीचे व्हेरिअशन करू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पुलावचे कोरडे मिक्स बनविण्यासाठी
  2. ब्राउन राइस २ कप
  3. किन्वा ३ कप
  4. बार्ली १ कप
  5. राळ ३ कप
  6. अक्खा मसूर २ कप
  7. मुगाची डाळ २ कप
  8. पुलावचे कोरडे मिक्स २ कप
  9. सिमला मिरची १ लहान चिरुन
  10. मक्याचे दाणे २ टेबलस्पून
  11. मटार चे दाणे २ टेबलस्पून
  12. कांदा १ मध्यम उभा चिरून
  13. गाजर १/२ मोठे तुकडे करून
  14. ब्रोकोली १/४ वाटी मोठे तुकडे करून
  15. लसूण हिरवी मिरची १/२ टेबलस्पून जाडसर कुटून
  16. तेल १/२ टेबलस्पून
  17. मोहरी १/२ टीस्पून
  18. हळद १/२ टीस्पून
  19. तिखट १/४ टीस्पून
  20. गरम मसाला १ टीस्पून
  21. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पुलावचे कोरडे साहित्य एकत्र करून मिश्रण डब्यात ठेवा.
  2. आता वरील मिश्रण २कप घेऊन धुवून घ्या.
  3. कुकरमध्ये तेल घाला,गरम झाल्यावर त्यात मोहरी ची फोडणी घाला.
  4. कांदा टाका, लसूण मिरचीची पेस्ट घाला.
  5. परतल्यावर सगळ्या भाज्या टाका.
  6. तिखट,हळद,गरम मसाला घाला.
  7. धुतलेले मिश्रण टाका.
  8. मीठ घाला,कुकरचे झाकण लावा.
  9. ३ ते ४ शिट्या झाल्या की गॅस बंद करा.
  10. आरोग्यदायी...शक्तीदायी पुलाव तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर