मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज रवा हांडवो

Photo of veg rava handvo by supriya padave (krupa rane) at BetterButter
621
5
0.0(0)
0

वेज रवा हांडवो

Feb-06-2019
supriya padave (krupa rane)
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज रवा हांडवो कृती बद्दल

भाज्या आणि रवा यापासून तयार केलेला एक snacks item,हा पदार्थ मुळचा गुजराथी आहे पण पटकन होण्यसाठी यात रवा वापरला आहे ,खुपच टेस्टी लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • गुजरात
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी रवा
  2. पाव वाटी बेसन
  3. एक गाजर किसलेले
  4. एक शिमला मिरची बारीक चिरून
  5. 8 ते 10 मटर च्या शेंगा
  6. 2 टेबल स्पून शेंगदाने
  7. एक चमचा आले मिर्ची पेस्ट
  8. एक चमचा धने पूड
  9. एक चमचा लाल तिखट
  10. पाव चमचा हळद
  11. थोडिशि कोथिम्बीर
  12. एक वाटी दही
  13. 1 टेबल स्पून इनो
  14. 6 टेबल स्पून तेल
  15. पाणी
  16. फोड़नी साठी
  17. राई
  18. जीरे
  19. तीळ
  20. कडीपत्ता

सूचना

  1. सर्व साहित्य जमा करा
  2. रवा बेसन व् दही चांगले एकजीव करा व् त्यात गरज लागेल एवढे पाणी टाका हे मिश्रण घट्ट सर भिजले पाहिजे . दीड कप पानी पुरे होते
  3. आता हयात सर्व साहित्य टाका फ़क्त इनो टाकू नका व् हे मिश्रण 15 मिनिटे झाकुन् बाजूला ठेवून दया
  4. आता एक पसरट भाड़े किंवा पैन तापत ठेवा त्यात तिन टेबल स्पून तेल टाका व् राइ जीरे तीळ कदीपत्ता टाकून फोड़नी करुन् घ्या
  5. हांडवो च्या मिश्रणा मधे इनो टाका व् चांगले फेटुन घ्या व् पैन मधे एकसारखे पसरवा व् वरून झाकण ठेवा
  6. हांडवो 10 मिनिट मंद आचेवर खरपुस भाजुन घ्या एक बाजू भाजुन झाली आहे
  7. आता दूसरी बाजू सुद्धा उरलेले 3 टेबल स्पून तेल व् राइ जीरे तीळ कड़ी पत्ता टाकून 10 मिनिट खरपुस भाजुन घ्या
  8. दोन्ही बाजूने खमंग भाजल्या नंतर आपला हांडवो तैयार आहे
  9. टोमेटो सौस बरोबर serve करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर