मुख्यपृष्ठ / पाककृती / Palakvadi gravy without oil

Photo of Palakvadi gravy without oil by deepali oak at BetterButter
190
3
5.0(0)
0

Palakvadi gravy without oil

Feb-14-2019
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. १पालक जूडी
 2. बेसन एक वाटी
 3. तांदूळाचे पीठ एक वाटी
 4. तिखट चार चमचे किंवा मालवणी मसाला
 5. मीठ
 6. हळद व हिंग
 7. सब्जी मसाला पाव चमचा
 8. कांदा एक मोठा
 9. टोमॅटो एक मोठा
 10. खोबरे किस किंवा तुकडे पाव वाटी
 11. हिरवी मिरची एक ते दोन
 12. आले व लसूण पाकळी तिन चार
 13. मगज बी एक चमचा किंवा काजू पाच ते सहा
 14. बडीशोप व जीरे एक चमचा
 15. कोथिंबीर पाव वाटी
 16. पाणी
 17. आवडत असल्यास गुळाचा एक लहान खडा

सूचना

 1. एका ताटात पालक धुवून चिरून घ्या.
 2. आता पालकात बेसन व तांदूळाचे पीठ घाला
 3. दोन चमचे तिखट किंवा मालवणी मसाला घाला,हिंग हळद मीठ व जीरे घाला
 4. आता जरासे पाणी घालून वडी करीता पीठ भिजवून चाळणीला तेलाचा हात फिरवून हे वडीचे मिश्रण त्यात ओतून हे मिश्रण दहा मिनिट वाफवून घ्या
 5. वडी वाफवून होई पर्यंत ग्रेव्ही ची तयारी साठी, मिक्सरमध्ये कांदा,टोमॅटो,मिरची,आले लसुण बडीशोप व काजू किंवा मगज गर कोथिंबीर खोबरे पाणी घालून वाटून घ्या.
 6. आता कढईत हे वाटण परतुन घ्या ह्या करिता तेल वापरायचे नाही.
 7. ह्यात तिखट मसाला व हळद हिंग घालून परतून घ्या सब्जी मसाला घाला.
 8. पाणी घालून ऊकळी येऊन द्या
 9. आता पालकाच्या मिश्रणाचे वड्या कापा
 10. ग्रेव्ही मध्ये मीठ व आवडत असल्यास गुळ घालून एक एक वडी ग्रेव्ही मध्ये सोडा
 11. छान उकळी काढा
 12. तुमची पालकवडी ग्रेव्ही विदाऊट ऑईल भाकरी पोळी किंवा नान सोबत खाण्यास तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर