Photo of Semolina Dhokla by Adarsha M at BetterButter
283
3
0.0(0)
0

रवा ढोकळा

Feb-20-2019
Adarsha M
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा ढोकळा कृती बद्दल

बनवायला सोप आणि खायला टेस्टी.

रेसपी टैग

  • सोपी
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ वाटी रवा
  2. १ मोठा चमचा हरभरा डाळ पीठ
  3. १ वाटी दही
  4. १ टी स्पून आल लसुण पेस्ट
  5. २ मिरच्या
  6. १ टी स्पून जिरे पूड
  7. १ टी स्पून खाण्याचा सोडा
  8. ४ चमचे साखर
  9. आश्यकतेनुसार पाणी
  10. चवीनुसार मीठ
  11. थोड तेल
  12. २ टी स्पून मोहोरी
  13. ५-६ कडीपत्ता ची पाने

सूचना

  1. सर्वप्रथम रवा नीट करून घ्यावे. एका मिक्सिंग बाउल मधे रवा, डाळ पीठ, दही, मीठ, मिरच्या चिरलेल्या, आल लसूण पेस्ट, जिरे पूड, पाणी घालून मिक्स करून घ्यावे.
  2. हे मिश्रण १५ मिनिट साठी रेस्ट होऊ द्यावे.
  3. आता बॅटर ची कन्सिस्टन्सी पाहून हवे तसे पाणी मिसळावे. आता त्यामध्ये सोडा व एक चमचा तेल घालून एका दिशेने फेटून घ्यावे.
  4. कुकर मधे एक ग्लास पाणी घालून उकळू द्यावे. कुकर ची शिट्टी काढून ठेवा.
  5. आता एका ग्रिस केलेल्या भांड्यामधे हे बॅटर घालून वाफवून घ्यावे. पहिले ५ मिनिट मोठ्या आचेवर व नंतर १५ मिनिट मंद आचेवर वाफवून घ्यावे.
  6. आता एका टूथपिक च्या मदतीने ढोकळा बनला की नाही चेक करा. जर टूथपिक क्लीन बाहेर निघाली तर ढोकळा तयार आहे. नसेल तर थोड अजून वाफवून घ्या.
  7. ढोकळा काढून थंड होऊ द्या. आता एका प्लेट मधे ढोकळा काढून घ्या.
  8. एका पॅन मध्ये थोड तेल गरम करावे a त्यात मोहोरी घालावे व तडतडू द्यावे. नंतर कडीपत्ता घालावीत. आता ह्या मधे साखर पाणी घाला ( ४ चमचे साखर+ पाऊण वाटी पाणी).
  9. आता वरून कोथिंबीर भुरभरावी.
  10. मस्त छान रवा ढोकळा तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर