मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी सोया बर्फी

Photo of Ragi soya barfi by Priti Kanhere at BetterButter
20
5
0.0(0)
0

नाचणी सोया बर्फी

Feb-24-2019
Priti Kanhere
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी सोया बर्फी कृती बद्दल

आत्ता उन्हाळा चालु आहे. नाचणी थंड आहे म्हणून ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खावी तब्येतीला चांगली असते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. नाचणी पीठ 2 वाट्या
 2. सोयाबीन पीठ 1/4वाटी
 3. साखर 2 वाट्या
 4. साजूक तूप 4 टेबलस्पून
 5. सुंठ पावडर 1/4चमचा
 6. ड्रायफ्रुट पावडर 1 ते 2 चमचे
 7. वेलची पावडर 1 चमचा
 8. पाणी

सूचना

 1. प्रथम एका किंवा पॅन मध्ये तूप घालावे.
 2. नाचणी पीठ व सोयाबीन पीठ घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे.
 3. भाजलेले मिश्रण एका ताटात काढूनथोडे पसरून गार होण्यासाठी ठेवावे.
 4. एका पातेल्यात साखर घालून त्यात साखर बुडेपर्यंत पाणी घालावे.
 5. गोळीबंद पाक करून घ्यावा.
 6. भाजलेल्या मिश्रणात सुंठ पावडर,वेलची पावडर, ड्रायफ्रूट पावडर घालावी.
 7. तयार झालेल्या पाकात वरील मिश्रण घालावे
 8. गॅस बंद करून मिश्रण एकसारखे ढवळावे
 9. थोडे आळल्यावर ताटाला तूप लावून थापावे
 10. थोडे गार झाल्यावर वड्या पाडाव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर