मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट चीझ पावभाजी

Photo of Cheese Pavbhaji by SUCHITA WADEKAR at BetterButter
73
1
0.0(0)
0

झटपट चीझ पावभाजी

Mar-05-2019
SUCHITA WADEKAR
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट चीझ पावभाजी कृती बद्दल

सुहाना पावभाजी मिक्स चे पॅकेट मिळाले अन त्यावर जी रेसिपी दिली आहे त्याप्रमाणे पावभाजी बनवली ... अगदी 20 मिनिटात झाली (बनण्यासाठीचा वेळ) .. मटार थोड्याश्या पाण्यात वाफवून घेतले ... बटाटे उकडले ... आणि भाज्या मात्र माझ्या आवडीप्रमाणे आणि घरी उपलब्ध होत्या त्या अगदी बारीक चिरून घेतल्या ... फ्लॉवर, सिमला मिरची, गाजर, टोमॅटो, मटार .. उकडलेला बटाटा इ. ... सगळी तयारी केली की अगदी 20 मिनिटात होते .. कलरही खूप सुंदर आला... वास आणि चवही अप्रतिम ... :ok_hand: आपण एरव्ही पावभाजी करताना भाज्या शिजवून घेतो परंतु इथे मी कच्याच पण बारीक चिरून वापल्या आहेत त्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते .. त्यामुळे इथूनपुढे आता भाज्या नशिजवता अशी पावभाजी बनवणार .. :thumbsup:

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. ● टोमॅटो 1 वाटी
 2. ● सिमला मिरची 1 वाटी
 3. ● गाजर 1 वाटी
 4. ● फ्लॉवर 1 वाटी
 5. ● वाफवलेले मटार 1 वाटी
 6. ● उकडलेले बटाटे 2
 7. ● हिंग पाव चमचा
 8. ● हळद पाव चमचा
 9. ● आवश्यकतेनुसार तेल
 10. ● सुहाना पावभाजी मिक्स 1 पॅकेट
 11. ● कांदा 1
 12. ● कोथिंबीर
 13. ● लिंबू
 14. ● पाव लादी
 15. ● अमूल चीझ
 16. ● अमूल बटर
 17. ● आवश्यकतेनुसार पाणी

सूचना

 1. 1. प्रथम बटाटे उकडून घावेत आणि मटार वाफवून घ्यावेत.
 2. 2. सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात .. फोटोत दाखवल्याप्रमाणे
 3. 3. मटार थोडेसे आख्खे ठेवून बाकी मिक्सरला थोडेसे ओबड धोबड फिरवावेत
 4. 4. बटाटा स्मॅश करून घ्यावा
 5. 5. थोड्याशा तेलावर हिंग, हळद घालून टोमॅटो परतून घावा
 6. 6. नंतर यात सर्व भाज्या एक एक करून घालाव्यात आणि एक वाफ आणावी
 7. 7. यानंतर यात मटार व बटाटा हि घालावा
 8. 8. यानंतर यात सुहाना पावभाजी मिक्स घालावे व चांगले परतुन आवश्यकतेनुसार पाणी घालावे आणि झाकण ठेवावे.
 9. 9. पाच ते सात मिनिटांनी झाकण उधडून भाजी एकदा हलवावी आणि वरून बटर व कोथिंबीर घालावी .
 10. 10. आपली पावभाजी तैयार !!
 11. 11. वरून चीझ किसून घालावे आणि कांदा, कोथिंबीर, लिंबूसह डिश सर्व्ह करावी ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर