चणा मसाला (महाराष्ट्रीयन स्टाईल) | Chana Masala. ( Maharashtrian style) Recipe in Marathi

प्रेषक Manisha Shukla  |  27th Mar 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chana Masala. ( Maharashtrian style) by Manisha Shukla at BetterButter
चणा मसाला (महाराष्ट्रीयन स्टाईल)by Manisha Shukla
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

545

0

चणा मसाला (महाराष्ट्रीयन स्टाईल) recipe

चणा मसाला (महाराष्ट्रीयन स्टाईल) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chana Masala. ( Maharashtrian style) Recipe in Marathi )

 • चणा (सुके) 1/2 वाटी
 • कांदे 2
 • टोमॅटो दीड
 • किसलेले खोबरे (सुके, ओले) 1 मोठा चमचा / नारळाचे दूध
 • आले किसलेले 1 लहान चमचा
 • लसूण ठेचलेला 1 लहान चमचा
 • खडा मसाला (दालचिनी, लवंगा, मिरे, तमालपत्र)
 • धणेपूड 1 लहान चमचा
 • हळद 1/2 लहान चमचा
 • मीठ, लाल तिखट स्वादानुसार तेल 2
 • तेल 2 लहान चमचे
 • सजविण्यासाठी : बारीक चिरलेली कोथिंबीर 2 लहान चमचे
 • ताजी साय 1 मोठा चमचा

चणा मसाला (महाराष्ट्रीयन स्टाईल) | How to make Chana Masala. ( Maharashtrian style) Recipe in Marathi

 1. चणे धुवा. कांदे चिरा.
 2. प्रेशर पॅनमध्ये तेल गरम करा.
 3. त्यात खडा मसाला घाला. त्याला तडतडू द्या.
 4. वाटण्यासाठी पॅनमधून काढून घ्या.
 5. आता कांदा घालून परता.
 6. त्यात किसलेले आले, लसूण, धणेपूड, हळद आणि लाल तिखट घाला.
 7. 2 मिनिटे परता. आता त्यात गरम पाणी घाला.
 8. जसे पाणी उकळायला लागले की त्यात चणे घालून चांगले मिसळा. 5 ते 6 शिट्या होईपर्यंत शिजवा.
 9. टोमॅटो ब्लेंड करा. एका वेगळ्या कढईत तेल गरम करा. त्यात ब्लेंड केलेलं टोमॅटो घालून परता.
 10. आता टोमॅटोमध्ये किसलेले खोबरे घाला. तुम्ही नारळाचे दूध सुद्धा वापरू शकता. परंतु ते टोमॅटो चांगले परतले गेल्यानंतर घालावे लागेल.
 11. टोमॅटो खोबऱ्याच्या मिश्रणाला चांगले परता.
 12. चांगले परतल्यानंतर त्यात ताजा वाटलेला गरम मसाला घाला.
 13. आता शिजवलेले चणे घाला. त्यांना पाहताच तोंडाला पाणी येत नाही का?
 14. आता चण्यात टोमॅटो खोबऱ्याचे मिश्रण घाला.
 15. ताजी साय घ्या आणि ढवळा.
 16. रश्यात घाला आणि चांगले एकजीव करा.
 17. तुमच्या चवीप्रमाणे मसाला बनवा. कोथिंबीरीच्या पानांनी सजवून वाढा.

My Tip:

तुम्ही प्रेशर कुकरमध्ये खडा मसाल्यासह चणे शिजवू शकता. तुम्ही बाजारातील तयार चणा मसाला घालू शकता.

Reviews for Chana Masala. ( Maharashtrian style) Recipe in Marathi (0)