मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी मसाला

Photo of Bhindi Masala by Fajeeda Ashik at BetterButter
1249
84
4.2(0)
0

भेंडी मसाला

Nov-22-2015
Fajeeda Ashik
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी मसाला कृती बद्दल

गडबडीच्या वेळी करायला सोपी चविष्ट अशी ही शाकाहारी डीश आहे आणि ज्यांना शाकाहारी डिशेस आवडत नाहीत त्यांना देखील ही डिश नक्की आवडेल. ही माझ्या पतीची खूप आवडती शाकाहारी डीश आहे. या डिशला कसुरी मेथीचा छान सुगंध येतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 किलो भेंडी
  2. 2 मध्यम आकाराचे कांदे
  3. 1 मोठा टोमॅटो
  4. 5 लसणाच्या पाकळ्या
  5. 1 टी स्पून धणे पावडर
  6. 1 मध्यम आकाराचे आल्ले
  7. लाल मिरची पावडर 1 टी स्पून किंवा जरूरीप्रमाणे जास्त
  8. 1/2 टी स्पून हळद पावडर
  9. 1/2 टी स्पून गरम मसाला पावडर
  10. 1/2 टी स्पून जीरे
  11. 1/2 टी स्पून कसुरी मेथी
  12. थोडी कोथिंबीर
  13. चवीनुसार मीठ
  14. जरूरीप्रमाणे तेल

सूचना

  1. भेंडी धुवून कोरडी करून घ्यावी . 1 इंच आकाराचे तुकडे करावेत. कढईत थोडे तेल टाकून थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत तळावे. अतिरिक्त तेल काढून टाकावे. दुसर्‍या कढईत 2 टेबल स्पून तेल ओतावे. ( भेंडी तळलेले तेल वापरावे ) .
  2. जीरे तडतडू द्यावेत. स्लाईस केलेला कांदा घालून सौम्य तांबूस होईपर्यंत परतावे . चिरलेले लसूण, आल्ले टाकून चांगले परतून घ्यावे .आता मिरची पावडर, धणे पावडर, हळद पावडर व गरम मसाला पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.
  3. कच्चा वास निघून गेल्यावर त्यात स्लाईस केलेला टोमॅटो टाकून चांगले परतून घ्यावे . आता तळलेली भेंडी घालून या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यावी . झाकण लावून 5-8 मिनिटे मंद आचेवर शिजवावे. त्यानंतर कसुरी मेथी व कोथिंबीर घालावी.
  4. चपाती किंवा प्लेन राईस बरोबर देखील गरमागरम खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर