अमृतसरी दाल मखनी | Amritsari Dal Makhani Recipe in Marathi

प्रेषक Ritu Sharma  |  23rd Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Amritsari Dal Makhani by Ritu Sharma at BetterButter
अमृतसरी दाल मखनी by Ritu Sharma
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6864

0

About Amritsari Dal Makhani Recipe in Marathi

अमृतसरी दाल मखनी recipe

अमृतसरी दाल मखनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Amritsari Dal Makhani Recipe in Marathi )

 • 3/4 कप उडीदडाळ
 • 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
 • 2 मोठे अगदी बारीक चिरलेले टोमॅटो
 • अर्धी वाटी ताजी साय
 • 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
 • 1 मोठा चमचा तूप
 • 1 मोठा चमचा तेल
 • 1 मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर
 • 2 मोठे चमचे आले-लसणाची पेस्ट
 • अर्धा लहान चमचा लाल तिखट
 • अर्धा लहान चमचा कैरी पावडर
 • अर्धा लहान चमचा धणेपूड
 • अर्धा लहान चमचा गरम मसाला
 • अर्धा लहान चमचा हळद
 • अर्धा लहान चमचा जिरे
 • 1 इंच चिरलेले आले
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • मीठ चवीनुसार

अमृतसरी दाल मखनी | How to make Amritsari Dal Makhani Recipe in Marathi

 1. रात्रभर उडीदडाळ भिजवून ठेवा. त्यातून अतिरिक्त पाणी गाळून घ्या.
 2. प्रेशर कुकरमध्ये डाळ, अर्धी वाटी कांदा, आले, मीठ आणि अडीच कप पाणी घालून 15-20 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
 3. वाफ निघाल्यानंतर डाळीत साय घाला. नंतर त्याला आणखी 10 मिनिटे शिजवा.
 4. दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर त्यात उरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घाला. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परता.
 5. टोमॅटो घाला आणि तेल सुटेपर्यंत शिजवा.
 6. लाल तिखट, हळद, कैरी पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ घालून 2-3 मिनिटे शिजवा.
 7. डाळीला फोडणी द्या आणि आणखी 5 मिनिटे शिजवा.
 8. साय आणि लोण्याने सजवा आणि पोळीबरोबर वाढा.

Reviews for Amritsari Dal Makhani Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo