घरी बनविलेले पनीर/भारतीय कॉटेज चीज | Homemade Paneer/Indian Cottage Cheese Recipe in Marathi

प्रेषक Kishorah Zaufer  |  23rd Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Homemade Paneer/Indian Cottage Cheese by Kishorah Zaufer at BetterButter
घरी बनविलेले पनीर/भारतीय कॉटेज चीज by Kishorah Zaufer
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  0

  माणसांसाठी

1301

0

घरी बनविलेले पनीर/भारतीय कॉटेज चीज recipe

घरी बनविलेले पनीर/भारतीय कॉटेज चीज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Homemade Paneer/Indian Cottage Cheese Recipe in Marathi )

 • दूध - 1 लिटर
 • लिंबाचा रस - 3-4 लहान चमचे
 • या वस्तूंची आवश्यकता आहे :
 • गाळणी
 • गाळण्यासाठी मलमली किंवा कोणतेही स्वच्छ कापड
 • 1 जेवणाचे ताट
 • भारी वजन उदा. मुसळ आणि खलबत्ता

घरी बनविलेले पनीर/भारतीय कॉटेज चीज | How to make Homemade Paneer/Indian Cottage Cheese Recipe in Marathi

 1. एका जाड तळाच्या भांड्यात दूध उकळवा. फेस येण्यास सुरुवात झाली की त्यात लिंबाचा रस घाला आणि हळूहळू हलवा. दह्यातील पाणी संपूर्णपणे वेगळे होईपर्यंत मंद आचेवर ठेऊन हलवत रहा. नंतर गॅस बंद करा.
 2. गाळणीवर कापड अशा प्रकारे ठेवा की कापडाचे चारी कोपरे धरून बांधले जाऊ शकतील. आता काळजीपूर्वक विरजलेले दूध ओता आणि या मिश्रणाला एकदा धुवा. आता कापडाचे चारी कोपरे एकत्र करून घट्ट गाठ बांधा.
 3. नंतर यातील पाणी गळून जाण्यासाठी लटकवा. याला 30-40 मिनिटे लागू शकतात.
 4. नंतर कापड उघडा आणि पनीरला एका ताटात काढा. हातांनी या मिश्रणाला गोल किंवा चौरस बनवा. पुन्हा त्याच कापडात बांधा आणि त्यावर वजन ठेवा. मी खलबत्ता ठेवला होता. हात लावल्याशिवाय त्याला 2-3 तास सेट होऊ द्या.
 5. काही तासांनी कापड काढून टाका आणि तुम्हाला आवडेल त्या आकारात कापा आणि एका हवाबंद डब्यात किंवा झिपलॉक पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. हे 2-3 दिवस ताजे राहील. लक्षात ठेवा पनीरला फ्रीजरमध्ये ठेऊ नका.
 6. पनीरला फ्रीजरमध्ये ठेऊ नका.

Reviews for Homemade Paneer/Indian Cottage Cheese Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo