शेगावची कचोरी | SHEGAON kachori Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  13th Dec 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • SHEGAON kachori recipe in Marathi,शेगावची कचोरी, Chayya Bari
शेगावची कचोरीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

शेगावची कचोरी recipe

शेगावची कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SHEGAON kachori Recipe in Marathi )

 • मैदा 4 वाट्या
 • मुगाची डाळ दीड वाटी
 • बेसन 2 चमचे
 • तिखट 1 चमचा
 • गरम मसाला 1/4चमचा
 • हळद,1/2चमचा
 • मीठ चवीनुसार
 • जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
 • तेल तळण्यासाठी

शेगावची कचोरी | How to make SHEGAON kachori Recipe in Marathi

 1. प्रथम तयारीत मैदा तेलाचे मोहन व मीठ घालून घट्ट भिजवावा
 2. मुगाची डाळ मिक्सरवर रवेदार बारीक करावी
 3. खूप बारीक नको
 4. मग बेसन थोडे तेल घालून खरपूस भाजावे
 5. तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी
 6. त्यात मुगडाळ परतून घ्यावे जरा छान मोकळी झाली की तिखट मीठ हळद मीठ गरम मसाला घालावा
 7. मग भाजलेले बेसन घालावे
 8. नीट मिक्स करून वाफ घ्यावी
 9. आता मैद्याची पारी घेऊन त्यात सारणाचे गोळी भरून कचोरी बंद करावी
 10. मग हातानेच पातळ करावी किंवा हलक्या हाताने थोडी लाटावी
 11. गरम तेलात सोडावी गुगली कि गाद मंद करून दोन्ही बाजूने खुसखुशीत तळावी
 12. चिंचेच्या चुटणेबरोबर सर्व करावी

My Tip:

कचोरीचा सुगंधानेच भूक चाळवली जाते पण ती मंद आचेवर टाळली तरच खुसखुशीत लागते

Reviews for SHEGAON kachori Recipe in Marathi (0)