मुख्यपृष्ठ / पाककृती / HORSE Gram soup

Photo of HORSE Gram soup by Minal Sardeshpande at BetterButter
18
15
0.0(2)
0

HORSE Gram soup

Dec-27-2017
Minal Sardeshpande
960 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • सूप
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. शिजलेल्या कुळथाचे पाणी 3 वाट्या
 2. ताक चार वाट्या
 3. नारळाचे दूध चार वाट्या
 4. मिरच्यांचे वाटप एक चमचा
 5. लसूण पेस्ट एक चमचा
 6. साखर दोन चमचे
 7. मीठ
 8. फोडणी साठी दोन चमचे तेल
 9. पाव चमचा हिंग
 10. पाव चमचा मोहोरी
 11. पाव चमचा हळद
 12. मूठभर कोथिंबीर

सूचना

 1. एक वाटी कुळीथ रात्री चार पाच वाट्या पाणी घालून भिजवा.
 2. कुळीथ
 3. सकाळी चाळणीवर काढा
 4. झाकून ठेवा, मोड येऊ द्या.
 5. मोड आल्यावर कुळीथ निवडून चार वाट्या पाणी घालून शिजवा.
 6. त्यातील पाणी काढून घ्या.
 7. हे शिजलेल्या कुळथाचे पाणी 3 वाट्या घेऊन गार करा.
 8. मिरच्यांची, लसूण पेस्ट करा.
 9. पूर्ण गार झाल्यावर त्या पाण्यात आपल्याला पाण्याच्या अडीच पट नारळाचं दूध आणि ताक मिसळायचं आहे.
 10. नारळाचं दूध काढून घ्या.
 11. कुळथाच्या पाण्यात नारळाचे दूध चार वाट्या, ताक चार वाट्या, मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, मीठ, साखर घालून ढवळा.
 12. कढईत तेल घ्या.
 13. मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करा.
 14. ती तयार सूपला द्या.
 15. लागल्यास चव बघून मीठ साखर वाढवा.
 16. कोथिंबीर धुवा आणि बारीक चिरून घ्या.
 17. सूप सर्व्ह करताना फक्त गरम करा, उकळू नका.
 18. वरून कोथिंबीर घालून सूप प्या
 19. उकळी काढल्यास सूप फुटण्याची शक्यता असते.
 20. याला कळण असेही म्हणतात.
 21. शिजलेल्या कुळथाची उसळ छान होते, ते फुकट जात नाहीत.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
सौ. राजश्री महानाड
Mar-04-2018
सौ. राजश्री महानाड   Mar-04-2018

मस्त मस्त

Rakshanda Sawant
Dec-28-2017
Rakshanda Sawant   Dec-28-2017

mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर