मुख्यपृष्ठ / पाककृती / चुरम्याचे लाडू

Photo of Churma laddu by Rohini Rathi at BetterButter
1113
8
0.0(0)
0

चुरम्याचे लाडू

Jan-08-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चुरम्याचे लाडू कृती बद्दल

चुरम्याचे लाडू हा राजस्थानमधील एक प्रसिद्ध गोड पदार्थ आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ दोन कप
  2. रवा अर्धा कप
  3. बेसन पीठ दोन टेबल स्पून
  4. तुप मोहनासाठी पाव कप
  5. सोडाच चिमटीभर
  6. तूप तळण्यासाठी
  7. किसलेला गूळ एक कप
  8. तुप पाकासाठी तीन टेबल स्पून
  9. वेलची पूड अर्धा टीस्पून

सूचना

  1. सर्वप्रथम गव्हाचे पीठ रवा बेसन मोहन सोडा व थोडेसे गरम केलेले पाणी वापरून घट्ट कणिक मळून घ्या
  2. कणकेची दहा ते पंधरा तुकडे करून छोटे बाटी बनवून दाबून घ्याव्यात
  3. तूप गरम करून मध्यम आचेवर लाल होईपर्यंत तळून घ्यावे
  4. तळलेल्या बाटी थंड करून मिक्सरमध्ये दळून घ्यावे
  5. मोठ्या चाळणीने चाळून त्याचा रवा काढावा
  6. हा रवा कढईमध्ये घालून तीन ते चार मिनिटे थोडासा भाजून घ्यावा
  7. गूळ आणि तूप एकत्र करून गुळाचा पाक करून घ्यावा
  8. नंतर त्यात ही विलायची पूड गरम केलेला रवा मिसळून एकजीव करून घ्यावे
  9. नंतर गरम असताना लाडू वळून घ्यावेत
  10. अशाप्रकारे चुरम्याचे लाडू तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर