मुख्यपृष्ठ / पाककृती / शिल्लक राहिलेल्या पाकाचे पॅनकेक

Photo of Leftover sugar syrup pancake by Swati Kolhe at BetterButter
1016
4
0.0(0)
0

शिल्लक राहिलेल्या पाकाचे पॅनकेक

Jan-08-2018
Swati Kolhe
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिल्लक राहिलेल्या पाकाचे पॅनकेक कृती बद्दल

आपण बऱ्याच वेळा गुलाबजामुन, रसगुल्ला वगैरे बनवतो किंवा विकत आणतो. ते आपण खाऊन फस्त तर करतो खरी, पण नंतर शिल्लक राहिलेल्या पाकचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहतो. मग डोक्यात १ १ पदार्थ सुचतात. पाकातले चिरोटे, शंकरपाळे, पाकातल्या पुऱ्या, शाही तुकडा आणखी बरच काही. त्यातल्या त्यात करता येणारा आणखी एक प्रकार म्हणजे गोड पॅनकेक किंवा चिल्ला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 10

  1. १ कप शिल्लक राहिलेल्या साखरेचा पाक
  2. १/२ कप दूध
  3. १/४ कप ड्राय फ्रुईट्स
  4. १/४ tsp ईलायची पावडर
  5. १/८ tsp जायफळ पावडर
  6. तूप किंवा तेल पॅनकेक बनवण्यासाठी (तुपाचे जास्त चांगले लागते)
  7. केशर (ऑप्शनल)

सूचना

  1. १. साखरेच्या पाकात दूध मिक्स करून त्यात मावेल इतपत पीठ किंवा मैदा घालायचा
  2. २. साधारण डोसा पेक्षा पातळ मिश्रण असते याचे. पण अगदी घावन सारखे पातळ हि नाही. थोडे मध्यम.
  3. ३. ड्राय फ्रुईट्स, ईलायची आणि जायफळ पावडर टाकून चांगले एकजीव करावे.
  4. ४. नॉनस्टिक पॅन वर तुप/ तेल टाकून उत्तप्पा सारखे बनवून/शेकून घ्यावे
  5. ५. प्रत्येक वेळी पॅनकेक बनवताना मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.
  6. ६. सर्व्ह करताना केशर घालून सर्व्ह करावे.:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर