Home / Recipes / Pancake

661
3
0.0(0)
0

Pancake

Jan-08-2018
Kshitija Joshi
75 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Tiffin Recipes
  • Goa
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. तांदुळ एक वाटी (७५ ग्रॅम)
  2. जाड पोहे पाव वाटी (१० ग्रॅम) पोहे हा घनपदार्थच अाहे पण त्याचे आकरमान जास्त अाहे व वजन कमी आहे, मी पाव वाटी पोह्यांचे वजन करुन १० ग्रॅम लिहीले आहेत. नाहीतर पाव वाटी घनपदार्थाचे वजन साधारण १९ ग्रॅम भरते.
  3. मेथीदाणे १ टीस्पुन (३ ग्रॅम)
  4. अोलं खोबरं (५० ग्रॅम)
  5. गुळ (५० ग्रॅम)
  6. हळद ½ टीस्पुन (१½ ग्रॅम)
  7. गोडेतेल १ टेबलस्पुन ( १५ मि.ली.)
  8. मिठ चवीप्रमाणे

Instructions

  1. तांदुळ, पोहे व मेथीदाणे अादल्या दिवशी दुपारी स्वच्छ धुवून भिजत ठेवा. ईडलीसारखे वेगवेगळे भिजवायची आवश्यकता नाही. एकाच भांड्यात भिजत ठेवले तरी चालेल.
  2. संध्याकाळी मिक्सरच्या भांड्यात अोल्या खोबऱ्याचे तुकडे व गुळ टाका अाणी थोडेसे पाणी टाकुन मिक्सरमधुन बारीक वाटुन घ्या. वाटुन झाल्यावर चमचाने मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे काही तुकडे राहीलेत का? ते चेक करा. काही वेळेस खोबऱ्याचे लहान तुकडे गोलाकार बनुन मिक्सरच्या ब्लेडमधे सापडत नाहीत व ते तसेच शिल्लक रहातात. जणुकाही लहान मोठे छर्रेच. तर असे खोबऱ्याचे छर्रे शोधुन परत त्यांची पेस्ट करा. अाता ही पेस्ट बॅटरसाठीच्या भांड्यात काढुन घ्या. त्याच मिक्सरच्या भांड्यात दुपारी भिजवलेले तांदुळ, पोहे व मेथीदाणे टाका अाणी बारीक वाटुन घ्या, व ते वाटण बॅटरसाठीच्या भांड्यात काढुन घ्या. अाता बॅटरच्या भांड्यात हळद, गोडेतेल व मिठ टाका. डोश्याच्या बॅटरची कन्सिस्टंसी येईल एवढे पाणी टाका, अाणी एकाच दिशेने चांगले फेटुन घ्या. गोडेतेल टाकल्यामुळे सुरनळी नरम बनेल, तसेच एकाच दिशेने फेटल्यामुळे हलकीसुद्धा बनेल.
  3. अाता वाटलेले व फेटलेले हे बॅटर आंबवण्यासाठी रात्रभर उबदार जागेत झाकुन ठेवा. त्यात उडिद दाळ नसतांना सुद्धा रात्रभरातुन ते दिड ते पावणेदोनपट फुगुन येईल. असे फुगुन अाले की सुरनळी जाळीदार झालीच म्हणुन समजा
  4. गॅसवर डोशाचा पॅन तापायला ठेवा. रात्री अांबवायला ठेवलेले बॅटर हलक्या हाताने पळीच्या सहाय्याने मिक्स करा. पॅन साधारण गरम झाला की तयार केलेले दोन पळी बॅटर त्यावर अोता. साधारण उत्तप्याची जेवढी जाडी असते , तेवढ्या जाडीच्या अंदाजाने पळीच्या उलट्या भागाने फिरवून त्यास गोल आकार द्या. लगेच पॅनवर झाकण ठेवा. गॅस मध्यम अाचेवरच राहू द्या. सुरनळीच्या बॅटर मधील पाण्याची वाफ होऊन झाकणात कोंडली जाईल. ति वाफ पॅनचे झाकणाला लागुन तिचे सांद्रीभवन होईल व थेंबाथेंबाने परत पॅनवर पडुन चुर्रर्रऽऽ चुर्रर्रऽऽ असा अावाज येऊ लागला की अापली सुरनळी तयार झाली असे समजायचे. (याला साधारण चार मिनीटे लागतात) ही सुरनळी एकाच बाजुने शेकायची अाहे. पलटी करुन दुसऱ्या बाजुने शेकायची गरज नाही कारण पॅनवर झाकलेल्या झाकणामुळे त्यात वाफ कोंडली जाउन ती बाजु छानपैकी वाफवली गेलेली असते. अाता पॅनवरील झाकण बाजुला काढुन पॅनवरुन सुरनळी उतरवून घ्या व गरम गरम सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE