मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट मावा बर्फी

Photo of Chocolate mawa barfi by Aarti Nijapkar at BetterButter
689
4
0.0(0)
0

चॉकलेट मावा बर्फी

Jan-09-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट मावा बर्फी कृती बद्दल

चॉकलेट मावा बर्फी आपण खाल्ली आहे पण कोको पावडर चा वापर करुन येथे मी थोडसं वेगळ करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हा सर्वांना आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • चिलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मावा १ कप
  2. पिठी साखर १/४ कप 
  3. दूध पावडर  २ टेबलस्पून 
  4. डार्क चॉकलेट   २०० ग्रॅम 
  5. पिस्त्याचे काप  सजावटीसाठी 

सूचना

  1. एका खोलगट कढईत मावा मंद आचेवर परतवून घ्या.
  2. मग पसरट ताटात  काढून घ्या, व गार करुन घ्या. 
  3. आता परतवून घेतलेल्या मावात दूधाची पावडर आणि पिठी साखर घालून हलक्या हाताने एकत्र करुन  घ्या .
  4. एका बेकिंग ट्रे किंवा पसरट ताटात घालून सेट करा  साधारण दिड ते दोन तासांसाठी 
  5. मग डार्क चॉकलेट  वितळवून घ्या (डबल बॉयलिंग कृतीच्या साहाय्याने  )
  6. सेट झालेल्या मावा बरफीचे हव्या त्या  आकारात कापून घ्या 
  7. मग मेल्ट चॉकलेट  मध्ये बरफीचा वरचा भाग घोळवून  घ्या.
  8. थोडा वेळ सेट करा  
  9. तयार चॉकलेट  मावा बरफीवर पिस्त्याचे तुकडे घालून  सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर