282
12
0.0(7)
0

Cake doughnut

Jan-20-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ३ वाट्या मैदा
  2. १ वाटी पिठीसाखर
  3. २ टे. चमचा घट्ट वनस्पती तूप
  4. १ चमचा थोडी शीग लावून बेकींग पावडर
  5. २ टे. चमचा दूध
  6. १ अंडे
  7. अर्धा चमचा मीठ
  8. १ जायफळाचा छोटा तुकडा
  9. ४ दालचिनीच्या काड्या
  10. ४-५ वेलदोडे.

सूचना

  1. जायफळ, दालचिनी व वेलदोडे यांची पूड करा.
  2. वनस्पती तूप फेटुन घ्या. त्यात साखर घालून फेटा. नंतर त्यात अंडे घालून फेटा. त्यात मैदा, मीठ व वेलची पूड घाला.
  3. नंतर जरुरीप्रमाणे दूध घालून पुरीसाठी पीठ भिजवतो तसे भिजवा व जाडसर पोळी लाटून डोनट-कटरने कापा व बेताच्या विस्तवावर तळा.
  4. तळताना कढईत तूप भरपूर असावे. अंडे घातलेले असल्यामुळे कढईत पुरी टाकली की थोडा फेस आल्यासारखे होते.
  5. छान दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यावे
  6. त्यावर तुम्ही आयसिंग वगैरे करुन डोनट सजवू शकता तसेच कोको पावडर टाकून चॉकलेट केक डोनट ही बनवू शकता.

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Pravin Jadhav
Jan-20-2018
Pravin Jadhav   Jan-20-2018

Delicious!

Amol Jadhav
Jan-20-2018
Amol Jadhav   Jan-20-2018

Best one

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर