Photo of Ukadiche Modak by Poonam Karnik at BetterButter
901
3
0.0(1)
0

Ukadiche Modak

Jan-21-2018
Poonam Karnik
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी

साहित्य सर्विंग: 8

  1. एक मोठा नारळ किसुन (खवणुन ) घेतलेला
  2. २०० ग्राम गुळ (jaggery ) बारीक़ चिरून घेतलेला
  3. अर्धि वाटि काजू बदामाचे काप
  4. अर्धि वाटि काजू बदामाचे काप
  5. ५० ग्राम खवा (मावा )
  6. वेलची पूड आवडीप्रमाणे
  7. पाव किलो तांदळाच पीठ
  8. जेवढे पीठ तेवढेच मोजून दूध पाणी एकत्र घेणे
  9. साजूक तूप सारणासाठी
  10. साजूक तूप सारणासाठी
  11. चवीपुराते मीठ ( उकड़ करण्यासाठि )

सूचना

  1. प्रथम एक मोठया आकाराचा खवणून (किसून)घेणे. त्यानंतर एका पॅन मध्ये दोन टेबल्स्पून तूप तापवून त्यात नारळाचा किस ५ मिनिटे परतून घेणे .त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला गुळ घालून परतून घेणे . आता ह्या मिश्रणात खवा घालून २ ते ३ मिनिटे परतून घेणे. खवा घालून झाला कि काजू बदामाचे काप आणि वेलची जायफळ पावडर घालून सगळे मिश्रण एकजीव करून घेणे. हे मिश्रण चांगले कोरडे करून घेणे . असे हे तयार सारण थंड होईपर्यंत पिठाची उकड करून घेणे उकड करण्यासाठी एका भांड्यात जेवढे पीठ घेतले आहे तेवढेच दूध आणि पाणी सप्रमाणात घेऊन उकळी आणून त्यात १ चमचा तूप व चवीनुसार अगदी थोडेसे मीठ घालून नंतर तांदुळाचे पीठ घालून उकड करून घेणे. आता हि उकड पाण्याचा हात घेऊन मळून घेणे पाण्याचा जास्त वापर करू नये .तयार उकडीचे छोटे गोळे करून त्याची हातानी अथवा लाटून पुरीएवढी पारी करून घेऊन त्यात १ चमचा सारण भरून मोदकाचा आकार देणे . अश्या प्रकारे सगळे मोदक तयार झाले कि ते स्टिम करून घेणे (साधारण १० ते १२ मिनिटे ) असे हे गरमा गरम मोदक तयार आहेत . ह्या मोदकांवर साजूक तूप घेऊन गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेणे . कृपया खाली दिलेल्या युट्युब लिंक वर क्लीक करून विडिओ पाहावा हि विनंती. https://youtu.be/_ZCpIqI2mn0 कृपया माझ्या फेसबुक पेज ला हि भेट द्यावी https://www.facebook.com/kayastprabhu/

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-22-2018
BetterButter Editorial   Jan-22-2018

Hi Poonam, kindly mention each step to prepare this recipe in separate lines. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर