राम लाडू | Ram Laddoo Recipe in Marathi

प्रेषक Anjana Chaturvedi  |  16th Feb 2016  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Ram Laddoo by Anjana Chaturvedi at BetterButter
राम लाडू by Anjana Chaturvedi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

4093

1

राम लाडू recipe

राम लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ram Laddoo Recipe in Marathi )

 • 3/4 वाटी मुगाची डाळ
 • 1/4 वाटी चणाडाळ
 • हिरव्या मिरच्या -3
 • किसलेले आले - 1 लहान चमचा
 • 2 मोठे चमचे कोथिंबीर
 • लाल तिखट - 1 लहान चमचा
 • हिंग - 1/4 लहान चमचा
 • जिरे - अर्धा लहान चमचा
 • मीठ - 1 लहान चमचा
 • सजविण्यासाठी :-
 • 1 वाटी मुळा
 • 2 लहान चमचे - ताजी कोथिंबीर
 • 2 लहान चमचे लिंबाचा रस
 • अर्धा लहान चमचा लाल तिखट
 • आर्धा लहान चमचा काळे मीठ
 • 3/4 वाटी चिंचेची चटणी
 • 3/4 वाटी हिरवी चटणी

राम लाडू | How to make Ram Laddoo Recipe in Marathi

 1. दोन्ही डाळींमध्ये पुरेसे पाणी घालून जवळजवळ 4 तास भिजवून ठेवा.
 2. नंतर पाणी काढून टाका आणि पुन्हा धुवा. त्यात हिरवी मिरची आणि हिंग घालून एकत्र करून वाटा. मिश्रण जाड आणि किंचित कडक असले पाहिजे. याला पूर्णपणे मऊ करू नका.
 3. आता या मिश्रणाला एका वाडग्यात घ्या आणि हलके आणि फुललेले होईपर्यंत फेटा.
 4. याला तपासण्यासाठी - एका वाडग्यात पाणी घ्या आणि त्यात मिश्रणातून एक लहान थेंब टाका. जर तो तरंगला तर समजा की मिश्रण तळण्यासाठी तयार आहे, अन्यथा त्याला आणखी फेटा आणि पुन्हा तपासा.
 5. मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात मीठ, जिरे आणि किसलेले आले मिसळा.
 6. एका कढईत तेल गरम करा. आता तुमचे हात ओले करा आणि तुमच्या हातात थोडे मिश्रण घ्या आणि भजी तळा.
 7. मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळा आणि पेपर नॅपकिनवर तेल झिरपण्यासाठी ठेवा.
 8. वाढण्याच्या प्लेटमध्ये ठेवा आणि गोळे हलके दाबा.
 9. त्यावर हिरवी आणि चिंचेची चटणी घाला.
 10. नंतर त्यात किसलेला मुळा, लिंबाचा रस आणि थोडे लाल तिखट आणि काळे मीठ घाला.
 11. शेवटी कोथिंबीर पसरा आणि टूथपिकबरोबर गरमागरम वाढा.

My Tip:

हे तळलेले गोळे तुम्ही टोमॅटो केचप किंवा अन्य कोणत्याही चटपटीत पदार्थाबरोबर एक स्टार्टर म्हणून वाढू शकता.

Reviews for Ram Laddoo Recipe in Marathi (1)

Mukta Deolalikara year ago

Reply

Cooked it ? Share your Photo