मुख्यपृष्ठ / पाककृती / रगडा पॅटिस

Photo of Ragda Pattice by Pavani Nandula at BetterButter
3435
504
4.8(0)
1

रगडा पॅटिस

Feb-16-2016
Pavani Nandula
480 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 मध्यम - बटाटे
  2. ब्रेड क्रम्स - अर्धी वाटी (तुमच्या आवश्यकतेनुसार)
  3. आले-लसणाची पेस्ट - 1 लहान चमचा
  4. धणेपूड - अर्धा लहान चमचा
  5. जिरेपूड - अर्धा लहान चमचा
  6. हळद - 1/4 लहान चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. सुके पिवळे वाटाणे - 1 वाटी रात्रभर भिजवलेले
  9. कांदा - 1 मध्यम बारीक चिरलेला
  10. टोमॅटो - 3 मध्यम चिरलेले
  11. टोमॅटो पेस्ट - 1 मोठा चमचा
  12. दही - अर्धा कप फेटलेले
  13. आले-लसणाची पेस्ट - 1 लहान चमचा
  14. हळद - 1/4 लहान चमचा
  15. लाल तिखट - 1 लहान चमचा (किंवा चवीनुसार)
  16. गरम मसाला - 1/2 लहान चमचा
  17. चाट मसाला - 1 लहान चमचा
  18. मीठ चवीनुसार
  19. टॉपिंगसाठी - हिरवी चटणी
  20. टॉपिंगसाठी : खजूर-चिंचेची चटणी
  21. लाल कांदा - 1 लहान बारीक चिरलेला
  22. टॉपिंगसाठी - शेव
  23. टॉपिंगसाठी - कोथिंबीर
  24. टॉपिंगसाठी - दही

सूचना

  1. बटाट्याचे पॅटिस बनविण्यासाठी, बटाटे कुस्करा आणि त्यात आले-लसणाची पेस्ट, धणेपूड, जिरेपूड, चाट मसाला आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा. त्यात पुरेसे ब्रेड क्रम्स घालून लवचिक कणिकसारखे मिश्रण तयार करा.
  2. या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराइतके घेऊन चपटे गोळे बनवून घ्या. आणि एका ताटात ठेवा.
  3. आता मध्यम आचेवर तवा गरम करा. त्यावर 2-3 लहान चमचे तेल घालून तयार केलेले पॅटिस बदामी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळा. रगडा तयार होईपर्यंत ते गरम राहतील असे ठेवा.
  4. रगडा बनाविण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये भिजवलेले वाटाणे मऊ होईपर्यंत शिजवा, परंतु अधिक गाळ होऊ देऊ नका. एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात कांदा घालून बदामी रंगाचा होईपर्यंत शिजवा.
  5. नंतर आले-लसणाची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला आणि चाट मसाला घालून 1-2 मिनिटे शिजवा. आता चिरलेले टोमॅटो, टोमॅटो पेस्ट आणि मीठ घालून झाकून ठेवा. टोमॅटो लुसलुशीत होईपर्यंत शिजवा.
  6. शेवटी फेटलेले दही मिसळा आणि 2-3 मिनिटे मंद आचेवर शिजवा. आणि नंतर आच बंद करा.
  7. वाढण्यासाठी, पॅटिसला एका प्लेटमध्ये ठेवा त्यावर रगडा घाला. याला चिरलेल्या कांदा, चटण्या, शेव, कोथिंबीर आणि दह्याने सजवा आणि आस्वाद घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर