मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगांचा कोळ

Photo of Drumstick curry by Anuradha Kuvalekar at BetterButter
681
3
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगांचा कोळ

Feb-02-2018
Anuradha Kuvalekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगांचा कोळ कृती बद्दल

नेहमी नेहमी आमटी खाण्याऐवजी आमटीला एक चांगला पर्याय आहे. ब-याच घरात केला जाणारा प्रकार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २-३ शेवग्याच्या शेंगा
  2. १/२ वाटी चिंचेचा कोळ
  3. २ चमचे चणाडाळीचे पीठ
  4. फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिंग, हळद
  5. ५-६ कडिपत्याची पानं
  6. १/२ चमचा लाल तिखट
  7. थोडासा गुळ
  8. ३ टेबलस्पून तेल
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घ्या. शेंगा थोड्याशा सोलून घ्या. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात शेंगांचे तुकडे व थोडे मीठ घालून शेंगा शिजवून घ्या.
  2. चणाडाळीच्या पीठात थोडे पाणी घालून पेस्ट करा.
  3. शिजवलेल्या शेंगांमधले पाणी काढू नका. त्याच पाण्यात चणाडाळीची पेस्ट, लाल तिखट, चिंचेचा कोळ, गुळ व चवीनुसार मीठ घालून पाणी उकळवा.
  4. छोट्या कढईत तेल तापवून थोडसं जिरं, मोहरी, हिंग, हळद, कडिपत्याची पानं घालून फोडणी करा. तयार फोडणी शेंगांच्या मिश्रणावर घाला. मिश्रण उकळून थोडे दाटसर होऊ द्या.
  5. गरमागरम शेंगांचा कोळ भाताबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर