मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पनीर कोफ्ता करी

Photo of Batata paneer Kofta curry by pranali deshmukh at BetterButter
768
4
0.0(0)
0

बटाटा पनीर कोफ्ता करी

Feb-05-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पनीर कोफ्ता करी कृती बद्दल

काहीतरी रेस्टोरेंट स्टाईल खाण्याची इच्छा झाली तर हि डिश बनवायला एकदम बेस्ट आहे .शिवाय छोट्या पार्टीसाठी पण छानच.मी इथे ग्रेव्हीसाठी खसखस वापरली आहे .शिवाय कोणत्याच बाहेरील रंगांचा वापर केलेला नाही तरीही रंग रेस्टोरेंट सारखा आलाय त्याच कारण तुम्ही जेव्हा एखादी रेसिपी करता तेव्हा प्रत्येक जिन्नस शिजवताना ,तळताना त्याच एक परफ़ेक्ट टायमिंग असत आणि गॅसची फ्लेम यावर रंग अवलंबून असतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • किटी पार्टी
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे बॉईल 2
  2. पनीर 1/2 पाव
  3. 1 बाउल काजू किसमिस तुकडे
  4. 1 कांदा
  5. 1 टोमॅटो
  6. 1/4 वाटी भिजवलेली खसखस
  7. तिखट 2 tbsp
  8. हळद 1 tbsp
  9. मीठ
  10. गरम मसाला 1 tbsp
  11. कॉर्नफ्लोर 3- 4 tbsp
  12. लसूण 5 पाकळ्या
  13. आले 1/2 इंच
  14. जिरे 1 tbsp
  15. तेल 2 डाव
  16. तेल तळायला

सूचना

  1. सर्व साहित्य असे जुळवून घ्या खसखस एक तास पाण्यात भिजवा म्हणजे पेस्ट स्मूथ होईल.
  2. बटाटे आणी पानीर किसून घ्या .त्यामध्ये तीन चमचे कोर्नफ्लोर टाका.
  3. थोडं मीठ घालून छान मळून घ्या.
  4. छोटा गोळा घेऊन त्याच्या मधोमध काजू आणि किसमिसचे तुकडे भरा .बंद करून टेनिस बॉलसारखा गोल आकार द्या.
  5. सर्व बॉल असेच बनवा.
  6. गरम तेलात तळून घ्या परतवताना हळुवारपणे पलटा कारण आतमध्ये फिलिंग आहे . गोल्डन ब्राऊन रंग यायला हवा.
  7. तळलेले बॉल
  8. खसखस बारीक वाटून घ्या.
  9. कांदा टमाटे ,लसूण अद्रक जिरे सर्व एकत्र पेस्ट मिक्सरमधून काढा.
  10. कढईत तेल टाका तेल तापलं कि कांद्याची टोमॅटो लसूण पेस्ट टाका थोडं तेल सुटायला आलं कि खसखशीची पेस्ट टाका .थोड्यावेळात .दोन्हीपेस्टचा रंग बदलेल .
  11. तिखट ,हळद ,मीठ ,गरम मसाला टाका थोडं मिक्स करून दोन वाट्या पाणी घाला .आपणइतर भाज्यांपेक्षा पाणी जास्त टाकत आहोत करत कोफ्ते पाणी शोषून घेतात .
  12. झाकण ठेवून ग्रेव्य् उकळू द्या .गॅस बंद करा आता बनवलेले कोफ्ते टाका आणि झाकण ठेवा .
  13. दहा मिनिटांनी पोळी ,पराठ्यासोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर