Photo of Mutton (Ranati) by Aarti Nijapkar at BetterButter
859
5
0.0(0)
0

मटण (रानटी)

Feb-08-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण (रानटी) कृती बद्दल

आज आपण बनवणार आहोत मटण (रानटी) आता प्रश्न पडला असणार बहुतेक जणांना की रानटी मटण नेमकं काय ? तर फारसा काही अवघड कृती नाही आहे नाव जितक वेगळ तितकीच रेसिपी सोपी आहे... पण कृती जरा आपल्या रोजच्या जेवणापेक्षा वेगळी आहे... चला तर साहित्य व कृती कडे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मटण ५०० ग्रॅम
  2. कांदे ७ ते ८
  3. लसूण अक्खा ८ ते १०
  4. बेडगी मिरची ४ ते ५
  5. हिरवी पेस्टसाठी लागणारे साहित्य
  6. कोथिंबीर २ मोठे चमचे
  7. आलं २ इंच
  8. लसूण १५ ते २०
  9. गरम मसालासाठी लागणारे साहित्य
  10. धने १ मोठा चमचा
  11. जिरे १ मोठा चमचा
  12. काळीमिरी १५ ते २०
  13. लवंग ५ ते ६
  14. हिरवी वेलची ३ ते ४
  15. वेलदोडे ४ ते ५
  16. दालचिनी ३ ते ४
  17. फोडणीसाठी मसाले
  18. लाल तिखट १ मोठा चमचा
  19. कांदा लसूण मसाला १ मोठा चमचा
  20. हळद १ लहान चमचा
  21. मीठ स्वादानुसार
  22. तेल

सूचना

  1. सर्व प्रथम मटण धुवून घ्या
  2. मग कुकर मध्ये मटण शिजवून घ्या मटनात चरबी असेल तर फोडणीच्या वेळेस घाला शिजवू नका
  3. हिरवी पेस्ट बनवून कोथिंबीर,आलं ,लसूण पाणी घालू नका
  4. गरम मसाला बनवून घ्या सर्व अक्खा मसाला धने आणि जिरे भाजून घ्या मग त्याची पावडर बनवून घ्या
  5. टोपात तेल तापवून घ्या त्यात चरबीअखे लसूण टाकून परतवून घ्या
  6. कांदे घाला व परतवून घ्या
  7. कांदा आणि लसूण लालसर होईपर्यंत परतवून घ्या मग बेडगी मिरची घाला
  8. मग १ ते २ मिनिटे परतवून घ्या
  9. आता वाटलेलं हिरवी पेस्ट आणि गरम मसाला घाला व एकजीव करून घ्या
  10. मसाल्याचे तिखट वास जाईपर्यंत चांगलं परतवून घ्या
  11. आता सर्व सुखे मसाले घाला व चांगलं परतवून घ्या मसाल्यांना तेल सुटे पर्यंत भाजून घ्या
  12. आता शिजवून घेतलेले मटण व मटणाचे पाणी घाला व सर्व एकजीव करून घ्या
  13. मसाला आणि मटण एकजीव होईपर्यंत उकळी काढा व पाणी थोडंस आटू द्या
  14. मग गरमागरम मटण तयार आहे... अकख्या लसनाच्या आतला घर खायचा आहे चवीला खूप छान लागतो
  15. हे मटण आपण चपाती, भाकरी ,भात , आंबोळी सोबत खाऊ शकतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर