Home / Recipes / Golayachi Aamati

Photo of Golayachi Aamati by Anuradha Kuvalekar at BetterButter
529
3
0.0(0)
0

Golayachi Aamati

Feb-02-2018
Anuradha Kuvalekar
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Boiling
  • Frying
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. गोळे करण्यासाठी साहित्य:
  2. १ वाटी भिजवलेली चणाडाळ
  3. चणाडाळीचे पीठ आवश्यकतेनुसार
  4. १/२ चमचा लाल तिखट
  5. १/४ चमचा हळद
  6. चिमुटभर हिंग
  7. मीठ चवीनुसार
  8. गोळे तळण्यासाठी तेल
  9. फोडणीकरिता तेल, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट
  10. मसाल्यासाठी लागणारे साहित्य:
  11. १ कांदा उभा चिरून
  12. २ टे. स्पून भिजवलेली चणाडाळ
  13. १-२ हिरव्या मिरच्या
  14. ५-६ लसुण पाकळ्या
  15. थोडेसे आलं
  16. १/२ वाटी किसलेले सुके खोबरं
  17. थोडेसे लाल तिखट
  18. थोडीशी हळद
  19. थोडासा हिंग
  20. १-२ चमचे गोडा मसाला
  21. १-२ चमचे धने पूड
  22. १/२ चमचा जिरंपूड
  23. मीठ चवीनुसार
  24. गुळाचा लहान खडा
  25. पाणी आवश्यकतेनुसार

Instructions

  1. २ टेबलस्पून चणाडाळ बाजूला ठेवून उरलेली चणाडाळ मिक्सरवर बारीक वाटुन घ्या. त्यात हळद, हिंग, थोडेसे तिखट, मीठ घाला. त्यात चणाडाळीचे पीठ घाला. पिठाचे गोळे होतील इतकेच चणाडाळीचे पीठ घाला.
  2. वरील तयार पीठातील १/४ वाटी तयार पीठ बाजुला ठेवुन उरलेल्या पिठाचे गोळे करा. गोळे करतांना हाताला थोडेसे तेल लावा. तयार गोळे गरम तेलात तळुन घ्या. तळलेले गोळे बाजूला ठेवा.
  3. एका कढईत २ चमचे तेल तापवून त्यात उभा चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात २ टे. स्पून भिजवलेली चणाडाळ, हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या व थोडेसे आलं घालुन परता.
  4. नंतर सुके खोबरं भाजून घ्या. वरील साहित्य एकत्र करून त्यात लाल तिखट, थोडीशी हळद, हिंग, गोडा मसाला, धनेपूड व जिरंपूड घालून मिश्रण मिक्सरमध्ये वाटा.
  5. एका कढईत १/२ वाटी तेल तापवा. त्यात मोहरी, हिंग, हळद, थोडेसे लाल तिखट घालुन फोडणी करा. त्यात १/४ वाटी बाजुला काढलेले गोळ्याचे मिश्रण घालुन परता. मिश्रण कोरडे होत आले की, त्यात मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घालून परता. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. धने-जिरं पावडर, गोडा मसाला, गुळ व मीठ घाला. चांगले उकळून घ्या तयार आमटीत तळलेले गोळे घाला.
  6. सर्व्ह करतांना गोळे फोडून त्यावर लसणीची फोडणी घालून द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE