मुख्यपृष्ठ / पाककृती / Kadhi funake

Photo of Kadhi funake by Ajinkya Shende at BetterButter
8
11
5.0(0)
3

Kadhi funake

Feb-15-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • मेन डिश

साहित्य सर्विंग: 5

 1. *कढीसाठी-
 2. दही २०० ग्रॅम
 3. बेसन ३ चमचे
 4. २-३ लवंगा
 5. २-३ काळी मीरी
 6. छोटा दालचीनी तुकडा
 7. अर्धा चमचा किसलेलं आलं
 8. तेल
 9. कढीपत्ता,हींग,जीरं,मोहोरी फोडणीसाठी
 10. १-२ हिरवी मिर्ची
 11. अर्धा चमचा साखर
 12. मीठ
 13. कोथिम्बीर
 14. *फुणक्यांसाठी-
 15. १ वाटी मुगाची डाळ
 16. अर्धी वाटी चण्याची डाळ
 17. २ चमचे तुरीची डाळ(सर्व डाळी ४ तास एकत्र भीजवुन ठेवाव्या)
 18. आलं,लसुण,कोथिम्बीर,हिरवी मिर्ची
 19. मीठ
 20. तेल
 21. जीरं,मोहोरी,तीळ,कढीपत्ता फोडणीसाठी

सूचना

 1. प्रथम भीजवलेल्या डाळी पाणी न टाकता आलं,लसुण,हिरवी मिर्ची,कोथिम्बीर व चवीनुसार मीठ टाकून मिक्सर मधे थोड्या जाडसर वाटून घ्याव्या.
 2. नंतर एका पातेलीत पाणी उकळत ठेवावे व वर चाळणी ठेवावी.(चाळणीला थोडं तेल लावून घ्यावे)
 3. पाणी ऊकळल्यावर डाळीच्या अर्ध्या मिश्रणाचे भजीप्रमाणे लांबाट आकारचे फुणके करुन चाळणीवर ठेवावे व झाकण ठेवून वाफेवर व्यवस्थित शिजवुन घ्यावे.(उरलेल्या मिश्रणाचे फुणके कढीत टाकून शिजवायचे)
 4. हे फुणके शिजेपर्यंत एका बाऊल मधे दहयात दिड ग्लास पाणी टाकून ताक बनवून घ्यावं व त्यात बेसन टाकून व्यवस्थित मिक्स करुन बाजुला ठेवावं.
 5. नंतर एका कढईमधे ४-५ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात जीरं,मोहोरी,हींग,कढीपत्ता,लवंग,दालचीनी व काळी मीरी टाकून एखाद मिनिट तेलात परतवुन घ्यावे.
 6. नंतर हयात बेसन पीठ मिक्स करुन केलेलं ताक टाकावं व मध्यम आचेवर कढी उकळू द्यावी.
 7. कढी उकळेपर्यंत वाफवुन घेतलेल्या फुंणक्यांना फोडणी देण्यासाठी एका पॅन मधे थोडं तेल घेवून तेल तापल्यावर त्यात कधीपत्ता,जीरं,मोहोरी व थोडी तीळ टाकून अर्धा मिनिट परतवुन त्यात फुणके टाकून थोडं टॉस करुन वरून कोथिम्बीर टाकावी व एका प्लेट मधे काढून ठेवावे.
 8. कढी ला एक उकळी आल्यानंतर त्यात आलं,थोडी कोथिम्बीर,चवीनुसार मीठ,साखर व उरलेल्या डाळीच्या मिश्रणाचे लांबट भजीच्या आकाराचे फुणके करुन कढीत टाकावेत व फुणके व्यवस्थित शिजेपर्यंत कढी मध्यम आचेवर उकळत ठेवावी.
 9. फुणके व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करुन वरून थोडी कोथिम्बीर टाकून कढी फुणके वरून कच्च तेल टाकून गरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी सोबत सर्व करावे.
 10. तीळाची फोडणी दिलेले फुणके स्टार्टर प्रमाणे नुसतेचं खावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर