मुख्यपृष्ठ / पाककृती / बीसी बेले हुळी अन्ना किंवा बीसी बेले भात

Photo of Bisi bele huli anna or Bisi bele bhaat by Aarti Nijapkar at BetterButter
1088
5
0.0(0)
0

बीसी बेले हुळी अन्ना किंवा बीसी बेले भात

Feb-16-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीसी बेले हुळी अन्ना किंवा बीसी बेले भात कृती बद्दल

बीसी बेले भात हा कर्नाटकचा पारंपरिक खाद्य आहे, हे खाद्य बहुतेक सर्व कर्नाटकी घराघरांत केले जाते, ह्या पदार्थात सहसा कांदा आणि लसूण वापरत नाही, बीसी बेले भातासाठी मसाला तयार करावा लागतो किंवा बाजारात सहज उपलब्द आहे, आता बीसी बेले भात म्हणजे नेमकं काय अर्थ आहे बीसी म्हणजे गरम बेले म्हणजे तुरीची डाळ आणि हुळी म्हणजे आंबट आणि अण्णा म्हणजे भात तर अगदी सोपी आणि चवदार अशी रेसिपी आहे तर बघुयात आपण ह्याचे साहित्य व कृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • रोस्टिंग
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बीसी बेले हुली अण्णा
  2. तांदूळ १/४ कप
  3. तुरीची डाळ १/२ कप
  4. ओला खोबरं पातळ कापलेले ५ ते ७
  5. चिंचेचा कोळ १ लहान चमचा
  6. गूळ १ मोठा चमचा
  7. हळद चिमूटभर
  8. मीठ चवीनुसार
  9. तूप १ लहान चमचा
  10. भाज्या
  11. गाजर १/४ कप
  12. वांग लहान १
  13. शेवगाची शेंग लहान तुकडे २ ते ३
  14. बीसी बेले हुली अण्णा मसाला पावडर
  15. बेडगी मिरची ३ ते ४
  16. लवंग २ ते ३
  17. दालचिनी पातळ १ इंच
  18. उरद डाळ १ लहान चमचा
  19. चना डाळ १ लहान चमचा
  20. जिरे १ लहान चमचा
  21. धना १ मोठा चमचा
  22. मेथी दाणे २ ते ३
  23. खसखस १/२ मोठा चमचा
  24. फोडणीसाठी
  25. तेल १ लहान चमचा
  26. कडीपत्ता पाने ४ ते ५
  27. हिंग चिमूटभर
  28. मोहरी १ लहान चमचा
  29. बेडगी मिरची तुकडे १ ते २

सूचना

  1. बीसी बेले हुली अन्ना साठी लागणारा मसाला बनवूया
  2. बेडगी मिरची , धने , जिरे , मेथी दाणे ,उरद डाळ , चना डाळ , इतर सर्व साहित्य घेऊन मंद आचेवर भाजून घ्या खमंग येईपर्यंत भाजा मग एका ताटात काढून घ्या व गार करून मसाला पावडर बनवून घ्या.
  3. तांदूळ धुवून भिजत ठेवा १० ते १५ मिनिटे मग तुरीची डाळ धुवून घ्या चिंच पाण्यात भिजवून ठेवा
  4. वेगवेगळ्या भांड्यात भात आणि डाळ कुकर मध्ये शिवून घ्या ३ शिटी होऊ द्या
  5. डाळ घोटून घ्या
  6. शिजलेले भात आणि शिजलेली डाळ एकत्र करून घ्या
  7. आता बीसी बेले अण्णा मसाला पावडर , चिंचेचा कोळ , गूळ , हळद ,थोडंस मीठ हे सर्व एकजीव करून घ्या व बाजूला ठेवून द्या
  8. सर्व भाज्या व ओल खोबरं चौकोनी लहान आकारात कापून घ्या
  9. एक भांड घेऊन त्यात तूप घाला मग कापलेल्या भाज्या घालून परतवून घ्या थोडा पाणी घालून अर्धे शिजवून घ्या पूर्ण शिजवायचे नाही
  10. थोडे शिजले की आपण तयार केलेला मसाला व थोडं घालून छान एकत्र करून घ्या एक उकळी येऊ द्या
  11. आता भात आणि डाळ घाला व मिश्रण एकजीव करून घ्या
  12. चवीनुसार मीठ तिखट बघा व पाणी आटवून घ्या
  13. तयार झालेल्या बीसी बेले हुली अण्णा वर आपल्याला फोडणी द्यायची आहे
  14. तेल तापवून त्यात कडीपत्ता , बेडगी मिरची , मोहरी आणि हिंग चांगली तडतडू द्या आणि बीसी बेले वर घाला
  15. गरमागरम बीसी बेले हुली अण्णा तयार आहे हे आपल्याला गरम असतानाच वाढायचे आहे व खायचं सुद्धा
  16. तर सर्व कुटुंब मंडळी बीसी बेले हुली अण्णा ह्या कर्नाटकी पारंपारिक खाद्य पदार्थाचा आस्वाद घावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर