मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयाचा उपमा

Photo of Shevai upma by Rohini Rathi at BetterButter
743
7
0.0(0)
0

शेवयाचा उपमा

Feb-20-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयाचा उपमा कृती बद्दल

शेवई उपमा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे ह विशेष करून न्याहारीसाठी बनवला जातो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवई एक कप
  2. तेल 1 टेबलस्पून
  3. जिरे अर्धा टीस्पून
  4. मोहरी अर्धा टीस्पून
  5. लाल मिरची पावडर दोन टीस्पून
  6. हळदी पावडर अर्धा टीस्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. बारीक चिरलेला कांदा एक
  9. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  10. शेंगदाणे 10 ते 12
  11. वाटाणे पाव वाटी
  12. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. सर्वप्रथम कढईत तेल गरम करुन जीरे मोहरीची फोडणी घालून घ्यावे
  2. नंतर गार बारीक चिरलेला कांदा टोमॅटो शेंगदाणे वाटाणे परतून घ्यावे
  3. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून नंतर शेवया परतून घ्याव्या
  4. शेवया चा रंग लालसर झाल्यानंतर मिरची पावडर हळद पावडर घालून परतून घ्यावे व आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यावे
  5. मंद आचेवर शेवया घट्ट होईपर्यंत शिजवून घ्याव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर