Photo of stuff bitter gourd by साची सचिन at BetterButter
1633
5
0.0(2)
0

stuff bitter gourd

Feb-22-2018
साची सचिन
20 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

stuff bitter gourd कृती बद्दल

ही मालवणी पद्धतीची रेसिपी आहे

रेसपी टैग

  • मध्यम
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. ३ ते ४ सफेद कारल
  2. १ १/२ चमचा धना जीरा पावडर
  3. १ चमचा गरम मसाला
  4. ३ ते ४ चमचे तिखट
  5. १/२ चमचा हळद
  6. १ चमचा आल लसुन पेस्ट
  7. चिंच गुळाचा कोळ
  8. चविंनुसार मिठ
  9. २ ते ३ चमचे शेंगदाणा कूट
  10. वाटणासाठी साहित्य:
  11. २ मोठे कांदे उभे चिरलेले
  12. अर्धी वाटी सुक खोबर
  13. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम कारल्याचे मध्यम आकाराचे तुकड़े करुन त्यातील बिया चमचाच्या मागील बाजूने काढून टाकाव्या आणि त्याला पूर्ण न कापता त्याला चार चीरा दया
  2. त्याला १/२ चमचा मिठ लावून १५ मिनिटे ठेवा
  3. आता एका कढ़ाइत सुक खोबर तेल न घालता भाजुन घ्या.मग त्याच कढ़ाइत २ चमचे तेल घेऊन कांदा ब्राउन होइ पर्यंत भाजुन घ्या
  4. आता कोथींबीर घालुन मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
  5. आता त्यात सर्व राहिलेल साहित्य घालुन चविनुसार मिठ घालुन घ्या
  6. सर्व एकजीव करा
  7. आता एक एक कारल्याचा तुकड़ा घेऊन त्यात वरील मिश्रण भरा
  8. आता एक पॅन मधे २ ते ३ चमचे तेल घेऊन चांगले तापु दया
  9. मग त्यात एक एक कारल ठेवून मंद गॅसवर १० ते १५ मिनिटे वफवु दया
  10. मग सर्व कारली परतून पुन्हा १५ मिनिटे वाफू दया
  11. मग राहिलेला मसाला त्यात घालुन थोड़ पाणी घालुन पुन्हा ५ मिनिटे वाफू दया

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seema Umrotkar
Feb-25-2018
Seema Umrotkar   Feb-25-2018

teasty

Pranay Ambukar
Feb-24-2018
Pranay Ambukar   Feb-24-2018

Khup chhan masst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर