मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो सार

Photo of Tomato curry by kanchan date at BetterButter
1096
3
0.0(0)
0

टोमॅटो सार

Mar-09-2018
kanchan date
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो सार कृती बद्दल

टोमॅटो मध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. आणि याचा बऱ्याच आजारावर नियंत्रण करण्यात मदत होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 4 लाल टोमॅटो
  2. अर्धी वाटी खवलेला ओला नारळ
  3. 5 लसणाच्या पाकळ्या
  4. 1 चमचा लाल तिखट
  5. अर्धा चमचा जिर
  6. अर्धा चमचा हळद
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 चमचा तेल
  9. कोथिंबीर

सूचना

  1. टोमॅटो धुवून 5 मिनिटे पाण्यात उकडून घ्या
  2. 5 मिनिटाने गॅस बंद करून टोमॅटो थंड पाण्यात घाला
  3. टोमॅटोच्या साली काढून घ्या
  4. मिक्सर जार मध्ये उकडलेले टोमॅटो, खवलेला नारळ, लसूण, हळद, लाल तिखट घालून बारीक वाटून घ्या
  5. एका भांड्यात तेल तापवून त्यात जीरा घाला
  6. जीरा तडतडल्यावर त्यात वाटलेले टोमॅटो घाला
  7. आता अंदाजे पाणी घालून सार पातळ करून घ्या व मीठ घालून मिक्स करा
  8. आता छान उकळी कढून घ्या व वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा
  9. गरम गरम भात किंवा भाकरी सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर