मुख्यपृष्ठ / पाककृती / योगर्ट सँडविच

Photo of Yogurt sandwich by Ajinkya Shende at BetterButter
542
10
0.0(0)
2

योगर्ट सँडविच

Mar-11-2018
Ajinkya Shende
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

योगर्ट सँडविच कृती बद्दल

पौष्टिक,चविष्ट व चटपटीत सँडविच चा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. २ चमचे पाणी काढून घेतलेलं घट्ट दही(चक्का)
  2. अर्धा लांब उभा कापलेला कांदा
  3. २ चमचे बारीक कापलेली सिमला मिरची
  4. २ चमचे बारीक कापलेला टोमॅटो
  5. १ चमचा वाफवलेले मुग
  6. जीरा पावडर
  7. मीठ
  8. काळ मीठ
  9. चाट मसाला
  10. पाव चमचा बारीक कापलेलं आलं
  11. कोथिम्बीर
  12. ब्राऊन ब्रेड 2 स्लाईज
  13. साजुक तुप
  14. *पुदीना चटणीसाठी-
  15. अर्धी वाटी पुदीना
  16. एक वाटी कोथिम्बीर
  17. २-३ हिरव्या मिरच्या
  18. १ चमचा डाळ्या
  19. अर्धा चमचा काळ मीठ
  20. चवीनुसार साधं मीठ
  21. जीरं
  22. अल्याचा छोटा तुकडा

सूचना

  1. प्रथम एका बाऊल मधे दही,मुग,कांदा,टोमॅटो,सिमला मिर्ची,मीठ,काळ मीठ,चाट मसाला,जीरा पावडर,चाट मसाला व कोथिम्बीर टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
  2. नंतर मिक्सर मधे अर्धी वाटी पुदीना,एक वाटी कोथिम्बीर,पाव चमचा जीरं,अर्धा चमचा काळ मीठ,१ चमचा डाळ्या,छोटा तुकडा आलं व २-३ हिरव्या मिरच्या टाकून चटणी बनवून घ्यावी.
  3. नंतर २ ब्रेड स्लाईज घेवून त्याचे काठ काढून दोन्ही स्लाईज ला चटणी लाऊन घ्यावी व त्यावर दहयाचं मिश्रण स्प्रेड करुन घ्यावं.
  4. नंतर पॅन मधे किंवा असल्यास सँडविच टोस्टर मधे तुप लावून सँडविच दोन्ही बाजूने क्रिस्प येईपर्यंत टोस्ट करुन घ्यावं.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर