मुख्यपृष्ठ / पाककृती / Chicken Popcorns

Photo of Chicken Popcorns by Purva Sawant at BetterButter
569
11
5(2)
0

Chicken Popcorns

Mar-14-2018
Purva Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • फेस्टिव्ह फन
 • नॉन व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • अमेरीकन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

 1. बोनलेस चिकन- २५० ग्रॅम
 2. कॉर्न फ़्लोवर- १ टीस्पून 
 3. अंड - १
 4. लसूण पावडर- १/२ टिस्पून किंवा लसूण पेस्ट- १ टीस्पून
 5. कांदा पावडर- १/२  टिस्पून किंवा कांदा पेस्ट- १ टीस्पून 
 6. मिरची पावडर- २ टिस्पून किव्हा आवडीनुसार 
 7. मिक्स हर्ब्स- १/२  टिस्पून
 8. मिरपूड- १ टीस्पून किंवा चवीनुसार
 9. Worcestershire सॉस किंवा लिंबाचा रस- १ टिस्पून
 10. मीठ- चवीनुसार
 11. मक्याचे पोहे (चिवड्यासाठी वापरतात ते), भरड चुरा करून - २ कप
 12. तळण्यासाठी तेल- आवश्यकतेनुसार

सूचना

 1. चिकन धुवून त्याचे छोट्या आकाराचे तुकडे करा.
 2. एक वाडग्यात  लसूण व कांदा पावडर, मिरची पावडर, मिक्स  हर्ब्स , मिरपूड, Worcestershire सॉस आणि मीठ एकत्र करा. 
 3. मिश्रण चांगले मिक्स करून त्यात चिकनचे तुकडे घालावे. चिकनच्या तुकड्यांना मिश्रण व्यवथित चोळावे आणि किमान २ तास चिकन मुरु द्यावे.
 4. नंतर त्यात अंड्याचा पांढरा भाग व कॉर्न फ्लोअर घालावे. सर्व काही चांगले मिक्स करावे.
 5. एका कढईत तेल गरम करायला ठेवा.
 6. एका डिशमध्ये मक्याच्या पोह्यांचा चुरा घ्या. एकएक चिकन तुकडा त्यात घोळवा. बाजूने तो चुरा चिकनला चिकटला पाहिजे
 7. अश्या प्रकारे सर्व चिकनचे तुकडे सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावेत. टिशू पेपरवर काढावेत.  
 8. गरमागरम चिकन पॉपकॉर्न्स टोमॅटो केचप आणि सलाड सोबत सर्व्ह करावे. 

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Mar-15-2018
Nayana Palav   Mar-15-2018

Wow

Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

Yum yum:yum::yum::yum:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर