फिल्टर कॉफी किंवा फिल्टर कापी | Filter Coffee or Filter Kaapi Recipe in Marathi

प्रेषक Chaitra Dev  |  30th Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Filter Coffee or Filter Kaapi by Chaitra Dev at BetterButter
फिल्टर कॉफी किंवा फिल्टर कापीby Chaitra Dev
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

128

0

फिल्टर कॉफी किंवा फिल्टर कापी

फिल्टर कॉफी किंवा फिल्टर कापी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Filter Coffee or Filter Kaapi Recipe in Marathi )

 • डिकॉक्शनसाठी :
 • कॉफी पावडर - 3 चमचे
 • (माझे कॉफी ब्लेंडमध्ये 60% कॉफी आणि 40% चिकोरी आहे)
 • पाणी 1 कप
 • डिकॉक्शन - 1/4 कप (तुमच्या आवश्यकतेनुसार)
 • दूध - 1 कप
 • साखर - 1 ते 2 लहान चमचे

फिल्टर कॉफी किंवा फिल्टर कापी | How to make Filter Coffee or Filter Kaapi Recipe in Marathi

 1. एका सॉस पॅनमध्ये पाणी उकळवा. गॅस बंद करा आणि त्यात कॉफी पावडर घाला. सावकाश हलवा.
 2. स्थिर होण्यासाठी 20 मिनिटे राहू द्या. 20 मिनिटानंतर पॅनच्या तळाशी कॉफी स्थिर होईल आणि वरील बाजूस स्वच्छ असे डिकॉक्शन मिळेल.
 3. दूध उकळवा. कॉफी मगमध्ये साखर आणि डिकॉक्शन घालून सावकाश हलवा आणि त्यात दूध घाला. तुमच्या आवडीनुसार डिकॉक्शन आणि साखर घाला.

My Tip:

1) तुम्ही फिल्टर कॉफी केंतेणार वापरू शकता. माझ्या घरात असे कंटेनर नाही आहे आणि माझी आई तिच्या सॉस पॅनमध्ये देखील एवढीच चांगली कॉफी बनविते. 2) डिकॉक्शन फ्रीजमध्ये साचवून ठेवू शकता, परंतु दिवसाबरोबर त्यातील तीव्रता देखील कमी होत जाते. 3) डिकॉक्शन 2 दिवसांपर्यंत रेफ्रीजरेट केले जाऊ शकते. 4) अवशेष कॉफीच्या मगमध्ये जमा होतील किंवा कॉफी अवशेषयुक्त होईल असे वाटत असेल, तर ते डिकॉक्शन मिश्रण दोनदा गाळून घ्या. तुम्ही कंटेनर वापरत असाल, तर हा धोका कमीत कमी असतो. 5) माझी आई तिची कॉफी नियमितपणे कॉफी डे प्रिया वेंडरकडून ब्लेंड करून घेते. आमच्यासाठी 60-40 हा अनुपात चालतो, परंतु तुम्ही कोणताही फिल्टर कॉफी ब्रँड वापरू शकता आणि बहुतेक 70-30 या अनुपातात असतात.

Reviews for Filter Coffee or Filter Kaapi Recipe in Marathi (0)