मुख्यपृष्ठ / पाककृती / सोपी पांढरे पास्ते

Photo of Easy white Pasta by Aarti Nijapkar at BetterButter
1628
4
0.0(0)
0

सोपी पांढरे पास्ते

Mar-24-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोपी पांढरे पास्ते कृती बद्दल

घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने आपण बनऊयात पांढरे पास्ते म्हणजे पांढरा सॉस करू मग त्यात पास्ता मिसळून घेऊ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इटालियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पास्ता अर्धे शिजवलेले १ कप
  2. तेल १ लहान चमचा
  3. लाल शिमला मिरची
  4. पांढरा सॉस साठी
  5. बटर २ मोठे चमचे
  6. मैदा १ मोठा चमचा
  7. दूध तापवून कोमट केलेलं १५० मिली
  8. मीठ चवीनुसार
  9. काळीमिरी पावडर १ लहान चमचा
  10. चीझ १ मोठा चमचा
  11. फ्रेश क्रीम १ मोठा चमचा
  12. मिक्स हर्ब्स १ लहान चमचा
  13. चिली फ्लेक्स १ लहान चमचा

सूचना

  1. पास्ता साठी पाण्यात थोडं तेल व मीठ घालून अर्धे कच्चे उकळून घ्या मग थंड पाण्याखाली धरून जाळीत काढा म्हणजे पाणी निघून जाईल आणि पास्ता चिकट होणार नाही
  2. एल पॅन मध्ये बटर घाला आणि मैदा घालून मंद आचेवर परतवून घ्या रंग बदलू नये ह्याची काळजी घ्या
  3. आता आच मंद ठेवूनच हळू हळू दूध घाला व सतत ढवळत राहा म्हणजे गोळा होणार नाही छानसं पातळ क्रीम तयार होईल मग फ्रेश क्रीम घाला व एक उकळी येऊ द्या सतत ढवळत राहा
  4. आता मीठ व काळीमिरी पावडर घाला व एकजीव करून घ्या आणि गॅस बंद करा
  5. आता एका पॅन मध्ये बटर घाला त्यात लाल शिमला मिरची थोडे परतवून घ्या मग त्यात मिक्स हर्ब्स घाला परतवून घ्या
  6. मग केलेला पांढरा सॉस घालून घ्या चिली फ्लेक्स घाला व वर चीझ किसून घाला विरघळले की गॅस बंद करा
  7. गरमागरम पांढरा सॉस पास्ता तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर