गुलाब जामुन | Gulab Jamun Recipe in Marathi

प्रेषक Rita Arora  |  4th Apr 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Gulab Jamun by Rita Arora at BetterButter
गुलाब जामुन by Rita Arora
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

458

0

Video for key ingredients

 • How to make Khoya

गुलाब जामुन recipe

गुलाब जामुन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gulab Jamun Recipe in Marathi )

 • मऊ खवा - 250 ग्रॅम
 • पनीर - 100 ग्रॅम
 • चाळून घेतलेला आटा - 1/3 कप
 • काजू - 1 टेबल स्पून
 • चिरोंजी - 1 टेबल स्पून
 • वेलदोडा पावडर - 1/4 टी स्पून
 • साखरेच्या पाकासाठी :
 • साखर - 3 कप
 • पाणी - 1 1/2 कप
 • वेलदोडा पावडर 1/4 टी स्पून

गुलाब जामुन | How to make Gulab Jamun Recipe in Marathi

 1. साखरेच्या पाकासाठी :
 2. पॅन गरम करून त्यात पाणी व साखर घालावी, पाणी उकळू द्यावे, ते उकळू लागल्यावर 4-5 मिनिटे किंवा तार येईपर्यंत उकळावे. वेलदोडा पावडर घालून आच बंद करावी.
 3. गुलाब जामुनसाठी :
 4. एका बाऊलमध्ये खवा, पनीर व चाळलेला आटा घालून तुमच्या तळव्याने चांगले मऊ होईपर्यंत मळावे.
 5. भरावासाठी : एका छोट्या बाऊलमध्ये, सुकामेवा व वेलदोडा पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.
 6. तयार झालेल्या पीठातील छोटा गोळा घेऊन तुमच्या तळव्याने दाबून सपाट करावा , त्यात थोडा भराव घालून सर्व बाजूंनी झाकून त्याचा गोळा बनवावा .
 7. हे गोळे मध्यम गरम तेलात सोडावेत , मंद आचेवर गोळे तळावे .
 8. आता या गोळ्यांवर डावाने तेल ओतावे. डाव त्याला लागू देऊ नये.
 9. डाव हळु हळु फिरवावा, त्यामुळे गोळे सर्व बाजूनी समान तळले जातील.
 10. तांबूस गोळे तेलातून बाहेर काढावेत, आता ते गोळे गोड, मऊ व हलके गुलाब जामुन तयार होण्यासाठी ते कोमट साखरेच्या पाकात 1-2 तास मुरू द्यावेत.

My Tip:

गुलाब जामुन तळण्यासाठी पुरेसे तेल किंवा तूप वापरावे.

Reviews for Gulab Jamun Recipe in Marathi (0)