मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला स्टफ्ड दोडका

Photo of MASALA stuffed dodka by Chayya Bari at BetterButter
2477
10
0.0(0)
0

मसाला स्टफ्ड दोडका

Apr-20-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला स्टफ्ड दोडका कृती बद्दल

मी ह्यात वाटनात दोडक्याच्या शिरा वापरल्या व अधिक पौष्टीक करण्याचा प्रयत्न केला इंनोव्हेटीव् आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोवळे दोडके २,३
  2. कांदा १छोटा
  3. खोबरे किस ४चमचे
  4. शेंगदाणे भाजलेले २चमचे
  5. धने जिरे पावडर प्रत्येकी १/२चमचा
  6. कोथिंबीर थोडी
  7. आले लसूण पेस्ट १चमचा
  8. तिखटव हळद १चमचा प्रत्येकी
  9. काळा मसाला २चमचे
  10. मीठ चवी नुसार
  11. जिरे मोहरी प्रत्यडकी १/२चमचा
  12. तेल ३,४ चमचे

सूचना

  1. प्रथम दोडक्याच्या शिरा काढून धुवून परतून घ्याव्या
  2. दोडक्याच्या बोटाइतके तुकडे करून त्याला एक चिरा द्यावा
  3. आता खोबरे किस,कांदा भाजून त्यात शेंगदाणे ,दोडक्याच्या परतलेल्या शिरा व कोथिंबीर घेऊन वाटणं करावे
  4. आता स्टफिंग तयार
  5. वाटनात तिखट,मीठ,हळद,धने जिरेपूड,काळा मसाला ,घालून मिक्स करावे व हे वाटणं दोडक्याच्या आत भरावे
  6. आता तेल तापवून जिरे,मोहरी फोडणी करावी उरलेले वाटणं आले लसूण पेस्ट घालून परतावे तेल सुटले कि स्टफ्ड दोडके त्यात घालून परतावे १वाटी गरम पाणी घालून मंद गॅसवर झाकण ठेवून १०मिनिटे शिजवावे
  7. दोडका मऊ झाला की भाजी तयार भाकरी किंवा पोळीबरोबर गरम कोथिंबीर घालून वाढावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर