मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स भाज्यांची खिचडी

Photo of Trendy mix veg pulav by Pratiksha Jadhav at BetterButter
602
5
0.0(0)
0

मिक्स भाज्यांची खिचडी

Apr-21-2018
Pratiksha Jadhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स भाज्यांची खिचडी कृती बद्दल

पारंपरिक खिचडीला ट्विस्ट.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/2 वाटी तांदूळ (बास्मती घेतल्यास चांगले)
  2. 1 लहान बटाटा
  3. 1 मध्यम आकाराचा कांदा
  4. 1 लहान शिमला मिर्ची
  5. 1 लहान वांगे
  6. 1 वाटी मिक्स भाज्या (मटार, फ्लॉवरचे तुकडे, तोंडली, कोबी)
  7. 1 टोमॅटो
  8. 1 चमचा शेंगदाणे
  9. 2 मोठे चमचे तेल
  10. 1/2 चमचा मोहरी
  11. चिमुटभर हिंग
  12. 1/2 चमचा आले लसुण पेस्ट
  13. 1/2 चमचा लाल तिखट
  14. 1/2 चमचा एव्हरेस्ट बिर्याणी पुलाव मसाला
  15. चवीनुसार मीठ
  16. सजावटीसाठी ओले खोबरे, कोथिंबीर
  17. साजुक तुप (वरुन घेण्यासाठी)

सूचना

  1. सर्व भाज्या चिरून, धुवुन घेणे.
  2. तांदूळ धुवुन घेणे.
  3. पॅन मध्ये तेल टाकून मोहरी टाकावी.
  4. आल लसूण पेस्ट घालावी, हिंग घालावे.
  5. नंतर चिरलेला कांदा घालावा, शेंगदाणे घालावे.
  6. कांदा जरा मऊ झाला की त्यात हळद, तिखट व पुलाव मसीला घालावा.
  7. नंतर भाज्या घालाव्या.
  8. थोडा वेळ भाज्या परताव्या.
  9. परतून झाल्सावर तांदूळ टाकावेत.
  10. तांदूळ परतून झाल्यावर 5 वाट्या गरम पाणी घालावे.
  11. आपल्या अंदाजानुसार पाणी घालावे, मऊ हवी असल्यास जास्त, सुटसुटीत हवी असल्यास कमी.
  12. चवीनुसार मीठ घालून परत एकदा हलवावे.
  13. पॅनला झाकण लावून मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या घ्याव्यात.
  14. गरम खिचडीवर साजूक तूप, खोबर, कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर