Photo of Dahi Bhopla Masala by Aarti Nijapkar at BetterButter
1337
7
0.0(1)
0

Dahi Bhopla Masala

Apr-21-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा १ वाटी
  2. दही १/४ वाटी
  3. तेल १ मीठ चमचा
  4. मोहरी १/२ लहान चमचा
  5. जिरे १/२ लहान चमचा
  6. कडीपत्ता ७ ते ८
  7. हिंग १/४ लहान चमचा
  8. कांदा चिरलेला १ मध्यम
  9. टोमॅटो चिरलेला १ लहान
  10. हिरवी मिरची उभी चिरलेली १ लहान
  11. कोथिंबीर १ मोठा चमचा
  12. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  13. ओल्या खोबऱ्याची पेस्ट १ मोठा चमचा
  14. लाल तिखट १ मोठा चमचा
  15. हळद १/४ लहान चमचा
  16. गरम मसाला १ लहान चमचा
  17. मीठ चवीनुसार

सूचना

  1. भोपळा कापून घ्या मध्यम असे काप करा
  2. एक कढई घ्या त्यात तेल तापवून घ्या मग मोहरी आणि जिरे घाला तडतडले की कडीपत्ता आणि हिंग घाला
  3. आता चिरलेला कांदा , टोमॅटो , हिरवी मिरची घालून चांगलं मंद आचेवर परतवून घ्या तेल सुटत आले की त्यात आलं लसूण व खोबऱ्याची पेस्ट घालून पुन्हा परतवून घ्या
  4. आता लाल तिखट , हळद , मीठ , गरम मसाला, कोथिंबीर घालुन मंद आचेवर मसाला एकजीव करून घ्या
  5. आता दही फेटून घ्या ( दह्यात पाणी नसावं) आणि मसाल्यात घाला व एकजीव करून घ्या २ मिनिटे वाफवून घ्या चांगली तर्री येईल
  6. आता भोळ्याचे काप घाला व एकत्र करून घ्या
  7. मग झाकण ठेवून ५ ते ६ मिनिटे वाफवून घ्या
  8. तयार भाजीवर कोथिंबीर चिरून घाला गरमागरम दही भोपळा मसाला तयार आहे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-22-2018
Nayana Palav   Apr-22-2018

Excellent

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर