पंजाबी छोले मसाला | Punjabi chole masala Recipe in Marathi

प्रेषक Deepika Chauhan  |  23rd Apr 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Punjabi chole masala by Deepika Chauhan at BetterButter
पंजाबी छोले मसाला by Deepika Chauhan
 • तयारी साठी वेळ

  9

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1098

0

पंजाबी छोले मसाला recipe

पंजाबी छोले मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Punjabi chole masala Recipe in Marathi )

 • प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यासाठी:
 • 2 वाट्या छोले
 • 2 कप पाणी
 • 2-3 सुकलेले आवळे
 • मीठ स्वादानुसार
 • मसाला रश्यासाठी :
 • कांदा - 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला
 • टोमॅटो - 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला
 • 2-3 लसणाच्या पाकळ्या + 1 लहान आल्याचा तुकडा = लसूण आल्याची पेस्ट
 • हिंग - 1/4 लहान चमचा
 • लाल तिखट - 1 लहान चमचा
 • धणेपूड - 1/2 लहान चमचा
 • जिरेपूड - 1/2 लहान चमचा
 • पंजाबी छोले मसाला - 2 लहान चमचे
 • हळद - 2 लहान चमचे
 • 2 काळे वेलदोडे
 • 4 काळे मिरे
 • 1 लवंग
 • 2 सुकलेल्या लाल मिरच्या
 • 1/2 लहान चमचा गरम मसाला
 • 1/2 लहान चमचा आमचूर पावडर
 • सजविण्यासाठी :
 • कोथिंबीर चिरलेली

पंजाबी छोले मसाला | How to make Punjabi chole masala Recipe in Marathi

 1. रात्रभर पाण्यात भिजवलेले छोले. (योग्य प्रमाणात पाणी घाला.) गडद रंग येण्यासाठी पारंपारिक असे सुकलेले आवळे घातले जातात.
 2. प्रेशर कुकरमध्ये छोले आणि सुकलेले आवळे घाला. त्यात मीठ आणि पाणी घाला. 20 मिनिटांपर्यंत प्रेशर कुकरमध्ये शिजवा. (एकदा ते शिजले की त्यातून आवळ्याचे तुकडे काढून टाका.)
 3. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात हिंग, काळे वेलदोडे, मिरे, लवंग, लसूण-आल्याची पेस्ट, सुकलेल्या लाल मिरच्या घालून चांगले परता.
 4. नंतर त्यात चिरलेला कांदा घाला आणि परता. नंतर चिरलेला टोमॅटो घालून चांगले शिजवा.
 5. हळद, लाल तिखट, जिरेपूड, आमचूर पावडर, गरम मसाला, पंजाबी छोले मसाला आणि स्वादानुसार मीठ घालून एकजीव करा.
 6. छोले शिजवण्यासाठी जे पाणी वापरले होते ते पाणी घालून काही वेळ शिजवा.
 7. कोथिंबीरीने सजवा आणि हे पंजाबी छोले कुलचा, भटुरे, पुऱ्या आणि कांदा, टोमॅटो आणि लिंबाचे काप यांच्यासह वाढा.

Reviews for Punjabi chole masala Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo